शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

५१९ सिमेंट नालाबांधांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: March 5, 2015 02:00 IST

अकोला जिल्ह्यातील १६ कोटींचा निधी प्राप्त; लवकरच सुरू होणार कामे.

संतोष येलकर / अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील सिमेंट नालाबांधांच्या कामांसाठी १६ कोटींचा निधी २0 फेब्रुवारी रोजी शासनाकडून प्राप्त झाला. त्यामुळे सिमेंट नालाबांधांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्ह्यात लवकरच ही जलसंधारणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात वारंवार उद्भवणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सन २0१५-१६ मध्ये अमरावती विभागात १ हजार ३९६ गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. त्यासाठी जलसंधारणाची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात अकोला जिल्ह्यातील २00 गावांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जिल्ह्यात ५१९ सिमेंट नालाबांधांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सिमेंट नालाबांधांची कामे हाती घेण्यासाठी शासनामार्फत जिल्हानिहाय निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ५१९ सिमेंट नाला बांधांच्या कामांसाठी १६ कोटींचा निधी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत २0 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून, जिल्ह्यात संबंधित यंत्रणांकडून सिमेंट नाला बांधांची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी लघू पाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत अंदाजपत्रके तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑनलाईन निविदा प्रक्रियाद्वारे या कामांचे वाटप केले जाणार आहे. सिमेंट नालाबांधांची जिल्ह्यातील कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.