शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरच्या कंत्राटदाराकडे सापडली ५ लाखाची रोकड

By admin | Updated: October 1, 2014 01:13 IST

रामदासपेठ पोलिस व आयकर विभागाच्या चौकशीनंतर व्यापार्‍यास परत केली रोकड.

अकोला : इंदोर येथील कंत्राटदाराच्या कारमध्ये मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ५ लाख १0 हजार रुपयांची रोकड मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती; परंतु रामदासपेठ पोलिस व आयकर विभागाच्या चौकशीनंतर सायंकाळी कंत्राटदाराला त्याची रोकड परत करण्यात आली. व्यापार्‍याने त्याच्या मजुरांना देण्यासाठी ही रोकड आणली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रतनलाल प्लॉटमधील विद्युत भवनासमोर उभ्या असलेल्या एमपी 0९ सीएच १८६१ क्रमांकाच्या कारमध्ये मोठी रोख रक्कम असल्याची माहिती मिळाली. पथकाने या ठिकाणी छापा घातला आणि कंत्राटदाराला कारसह रामदासपेठ पोलिस ठाण्यात आणले. ही कार इंदोर येथील कंत्राटदार रोहित गोविंददास सोमाणी (३८) यांची असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. अकोला शहरात वीज मीटरची छायाचित्रे घेऊन त्याची देयके देण्याचा कंत्राट त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी ही रोकड सोबत आणल्याचे सोमाणी यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, ही माहिती महसूल विभागाला मिळाल्याने अधिकारी, कर्मचारी व आयकर विभागाच्या अधिकारी रूपा धांडे, निम हे पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी सोमाणी यांची चौकशी सुरू केली. चौकशीअंती सोमाणी यांनी ही रोकड निवडणूकसंबंधीच्या कामासाठी न आणता, त्यांच्या कर्मचार्‍यांचे वेतन देण्यासाठी आणल्याचे स्पष्ट झाल्याने, त्यांची रोकड परत करण्यात आली. या घडलेल्या सर्व प्रकाराचे छायाचित्रण निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने हे येथे विशेष.