अकोला जिल्ह्यात दोन दिवसांत २९ नवे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 01:00 PM2020-11-15T13:00:46+5:302020-11-15T13:01:05+5:30

CoronaVirus in Akola एकूण २९ नवे रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णसंख्या ८,७२२ झाली आहे.

29 new corona positive in two days in Akola district | अकोला जिल्ह्यात दोन दिवसांत २९ नवे कोरोना पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात दोन दिवसांत २९ नवे कोरोना पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, शनिवार व रविवार या दोन दिवसांत आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २५ तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये चार असे एकूण २९ नवे रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णसंख्या ८,७२२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवार व रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ, एदलापुर ता. अकोट, केशव नगर, डाबकी रोड, केळकर हॉस्पीटल व हिरपुर ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, गोकुळ कॉलनी, गोरक्षण रोड, शास्त्री नगर, धानोरी, वृंदावन नगर, नांदखेड, मुर्तिजापूर, तारफैल क्वॉटर, बाळापूर, विश्वकर्मा नगर व शंकर नगर, रॉयल रिजेंसी महाजन प्लॉट व शिक्षक कॉलनी खडकी येथील रुग्णांचा समावेश आहे.

रॅपिड चाचण्यांमध्ये चार पॉझिटिव्ह
शनिवारी झालेल्या एकूण ६५ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये चार अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २३४३६ चाचण्यांमध्ये १६११ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


३१४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,७२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८१२५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३१४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: 29 new corona positive in two days in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.