शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

२० लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

By admin | Updated: June 13, 2017 00:40 IST

विशेष पथक आणि वाहतूक शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा मोठा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी पहाटे तीन ठिकाणी छापेमारी करून पकडला. त्यानंतर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलिसांनी एका कारमधून नेण्यात येत असलेला ५ लाखांचा गुटखा साठा जप्त केला आहे. तब्बल २० लाख रुपयांचा गुटख्याचा साठा पोलिसांनी पकडल्याने अग्रवाल नामक गुटखा माफिया पोलिसांवरही शिरजोर झाल्याचे बोलल्या जात आहे.रजपूतपुरा येथील रहिवासी तथा गुटखा माफिया घनश्याम सीताराम अग्रवाल (६२) आणि चमन सीताराम अग्रवाल (४९) तसेच जवाहर नगरातील चंद्रनारायण लालचंद अग्रवाल या तिघांचे किराणा बाजारात अंबिका पानमसाला, जगदंबा सुपारी स्टोअर्स आणि भगवती सुपारी स्टोअर्समधून प्रतिबंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी या माहितीच्या आधारे रविवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटेपर्यंत किराणा बाजारात सापळा रचला. तीनही दुकानांमध्ये तब्बल १५ लाख रुपयांचा गुटखा साठा असल्याने निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सोमवारी पहाटे पथकासह या तीनही दुकानात छापेमारी केली. काही वेळातच तब्बल १५ लाख रुपयांचा गुटखा हर्षराज अळसपुरे यांनी जप्त केला. त्यानंतर सदर गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे. घनश्याम अग्रवाल हा जिल्ह्यातील सर्वात मोठा गुटखा माफिया असल्याचे समोर आले असून, १५ दिवसांच्या कालावधीत विशेष पथकाने त्याच्याकडून तब्बल २५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. त्यानंतर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात सोमवारी वाहनांचे दस्तावेज तपासणी सुरू असताना एका कारची तपासणी केली असता यामधूनही तब्बल ५ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा वाहतूक पोलिसांनी जप्त केला. विशेष पथकाचे प्रमुख अळसपुरे आणि वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी गुटख्याचा मोठा साठा पकडल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.घनश्याम अग्रवालसह तिघांना समजपत्रगुटखा माफिया घनश्याम अग्रवालसह तीनही अग्रवाल गुटखा माफियांना विशेष पथकाचे प्रमुख अळसपुरे यांनी समजपत्र दिल्याची माहिती आहे. यानंतर गुटखा विक्री किंवा खरेदी केल्यास घनश्याम अग्रवालसह तिघांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी गुटखा माफियांना व त्याच्या साथीदारांनी पोलिसांनी दिली आहे.