17 metric tons of oxygen reserves in Akola district | अकाेला जिल्ह्यात ऑक्सिजनचा १७ मेट्रिक टन साठा

अकाेला जिल्ह्यात ऑक्सिजनचा १७ मेट्रिक टन साठा

अकाेला : जिल्ह्यात ऑक्सिजनचा १७ मेट्रिक टन साठा असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० किलोलिटर्स, जिल्हा स्त्री रुग्णालयात १३ किलोलिटर्स, तर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये १० किलोलिटर्स अशी लिक्विड ऑक्सिजन संयंत्रे सज्ज असून, त्यातून पुरवठा होत असतो. खासगी रुग्णालयांना सात मेट्रिक टन व शासकीय रुग्णालयांना तीन मेट्रिक टन असा ऑक्सिजन हा सिलिंडर स्वरूपात पुरवला जातो. त्यासाठी जिल्ह्यात १७ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.

रुग्णांनी घाबरू नये; मात्र जागरूक राहावे

अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यात पुरेशा खाटा, रेमडेसिविर इंजेक्शन्सही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. रुग्णांनी घाबरून न जाता जागरूक राहावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

Web Title: 17 metric tons of oxygen reserves in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.