Women beat at Bhangar; Violation of offense against twelve | भिंगार येथे महिलांना मारहाण; बारा जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

भिंगार येथे महिलांना मारहाण; बारा जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

अहमदनगर: भिंगार येथील आलमगीर परिसरात शनिवारी रात्री दोन महिलांसह तरुणांना मारहाण झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मारहाण करणा-या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी भिंगार पोलीस ठाण्यात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. 
यावेळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व भिंगार पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाटील यांनी जमावाशी संवाद साधून त्यांना शांत केले. आलमगीर परिसरात राहणा-या दोन महिला शनिवारी रात्री नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडल्या. तेव्हा चार तरुणांनी त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी महिलांचा आवाज ऐकून आलेल्या दोन तरुणांनाही मारहाण झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. शनिवारी रात्री अडीच वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात गोंधळ सुरू होता. दरम्यान याप्रकरणी सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हयाब्रेड उर्फ शहाबाद, शहारुख शेख, सोहेल शहा, शोएब शहा, तन्नू उर्फ तन्वीर, सलमान शेख, जुबेर खान, अजर खान, शौकत सुलेमान सय्यद उर्फ बब्बू निसार शेख यांच्यासह इतर दोघांविरोधात मारहाण व विनयभंगप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Women beat at Bhangar; Violation of offense against twelve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.