शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

जिल्ह्यातील माध्यमिकच्या २९ शाळांना अनुदानाची प्रतीक्षा : आदेशाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 11:40 AM

गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याने जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या खासगी २९ शाळांना शासनाने अनुदान घोषित केले आहे. प्रत्यक्षात मात्र अनुदानाचा आदेश राखून ठेवला आहे. अनुदानाचा आदेश कधी निघतो, याकडे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याने जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या खासगी २९ शाळांना शासनाने अनुदान घोषित केले आहे. प्रत्यक्षात मात्र अनुदानाचा आदेश राखून ठेवला आहे. अनुदानाचा आदेश कधी निघतो, याकडे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शासनाच्या १ व २ जुलै २०१६ च्या निर्णयानुसार जिल्ह्यातील २९ शाळा २० टक्के अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. तसा आदेश नुकताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे.  पात्र शाळांना पहिल्या टप्प्यात २० टक्के अनुदान मिळणार आहे. येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होतील.शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच किमान २० टक्के पगार हातात पडेल, अशी आशा या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना होती. परंतु, शासनाने अनुदानाची घोषणा केली. अनुदानाची घोषणा करतानाच अनुदानाचा स्वतंत्र आदेश काढला जाईल, असे नमूद केले. घोषणा झाल्याने अनुदान मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु, ते कधी मिळणार, याबाबत मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.शाळा स्थापनेपासून शिक्षकांनी शाळेसाठी कष्ट उपसले़ कमी पगारात ज्ञानदानाचे काम अविरत सुरू ठेवले. संस्थाचालकांनी पदरमोड करून शाळा उभ्या केल्या. ग्रामीण भागातील मुलांना करावी लागणारी पायपीट थांबली. त्यांची गावातच सोय झाली. गावात माध्यमिक शाळा आली. पण, शिक्षकांना पूर्ण वेतन मिळत नव्हते़ अशा परिस्थितीतही त्यांनी धीर सोडला नाही.आज ना उधा अनुदान मिळेल, या आशेवर दहा ते पंधरा वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांची त्यांची तपश्चर्या फळाला आली. पण, त्यातही शासनाने अनुदानाचा स्वतंत्र आदेश काढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अनुदानासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. अनुदानास पात्र घोषित शाळाकर्जत-२, नेवासा-६, राहुरी-२, राहाता-७, श्रीरामपूर-२, शेवगाव-१, श्रीगोंदा-१, जामखेड-१, नगर-४, पाथर्डी-१जिल्ह्यातील २९ शाळा २० टक्के अनुदानास पात्र झाल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव शासनाला पाठविला असून, अनुदानासाठीचा स्वतंत्र आदेश निघेल. त्यानंतर शाळांना अनुदान वितरित करण्यात येईल. -लक्ष्मण पोले, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद