बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली विखेंची नातवंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 06:23 AM2020-08-31T06:23:29+5:302020-08-31T06:24:12+5:30

लोणी बुद्रूक (ता़ राहाता) येथील शेतात विखे या नातवंडांना घेऊन बसल्या होत्या़ विखे यांचे चिरंजीव खासदार डॉ़ सुजय विखे यांची सहा वर्षांची कन्या अनिशा आणि विखे यांची कन्या सुस्मिता यांचा मुलगा जयवर्धन यांना शालिनी विखे खाऊ घालत होत्या़

Vikhe's grandchildren rescued from leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली विखेंची नातवंडे

बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली विखेंची नातवंडे

googlenewsNext

लोणी (जि़अहमदनगर) : माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांची दोन नातवंडे शनिवारी बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले़ शालिनी विखे या उसाच्या शेताजवळ नातवंडांना खाऊ देत असतानाच बिबट्याने झेप घेतली़ मात्र, त्याचवेळी त्यांचे कुत्रे मध्ये आले़ कुत्र्याला जबड्यात पकडून बिबट्याने क्षणात उसात धूम ठोकली़
उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने थेट मुलांच्या दिशेने झेप घेतली़ डोळ्याची पाणी लवते न लवते, तोच बिबट्या कुत्र्याला घेऊन दिसेनासा झाला़
अचानक हल्ल्याने शालिनी विखेही घाबरल्या़

Web Title: Vikhe's grandchildren rescued from leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.