अपहार प्रकरणात पोलीसांकडून अर्बन बँकेच्या संचालकांचा शोध; एकास घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 10:07 AM2021-03-06T10:07:07+5:302021-03-06T10:07:38+5:30

अहमदनगर : कर्ज प्रकरणात नगर अर्बन बँकेची 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे नगर शहरात छापा टाकून बँकेच्या एका संचालकाला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात आरोपी असलेल्या इतर संचालकांचाही शोध सुरू आहे.

Urban bank directors traced by police in embezzlement case; One was taken into custody | अपहार प्रकरणात पोलीसांकडून अर्बन बँकेच्या संचालकांचा शोध; एकास घेतले ताब्यात

अपहार प्रकरणात पोलीसांकडून अर्बन बँकेच्या संचालकांचा शोध; एकास घेतले ताब्यात

Next

अहमदनगर : कर्ज प्रकरणात नगर अर्बन बँकेची 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे नगर शहरात छापा टाकून बँकेच्या एका संचालकाला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात आरोपी असलेल्या इतर संचालकांचाही शोध सुरू आहे.

कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या चिंचवड शाखेची २२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान पावर हाऊस चौक, चिंचवडगाव येथील नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या शाखेत हा प्रकार घडला.

याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बॅंकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बॅकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय ५६, रा. अहमदनगर) यांनी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी कर्ज घेणाऱ्या एकास शुक्रवारी अटक केली आहे. या गुन्ह्यात बँकेचे संचालक मंडळही आरोपी असल्याने त्यांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांचे पथक शनिवारी पहाटेच नगरमध्ये दाखल झाले. बँकेच्या एका संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. इतरांनाही ताब्यात घेऊन चौकशी केले जाणार असून गरज पडली तर त्यांना अटकही करण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक बाबर यांनी सांगितले.

Web Title: Urban bank directors traced by police in embezzlement case; One was taken into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.