अवघ्या साडेतीन हजारात तयार झाली सॅनिटायझेशन व्हॅन : पोलीस प्रशासनाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:13 PM2020-04-11T19:13:07+5:302020-04-11T19:16:01+5:30

बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मोटार परिवहन विभागाने अवघ्या साडेतीन हजार रुपयात सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली आहे.

Three and a half thousand sanitization vans: police administration initiative | अवघ्या साडेतीन हजारात तयार झाली सॅनिटायझेशन व्हॅन : पोलीस प्रशासनाचा उपक्रम

अवघ्या साडेतीन हजारात तयार झाली सॅनिटायझेशन व्हॅन : पोलीस प्रशासनाचा उपक्रम

Next

अहमदनगर : बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मोटार परिवहन विभागाने अवघ्या साडेतीन हजार रुपयात सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली आहे. अवघ्या चार ते पाच दिवसात तयार करण्यात आलेल्या अशा नऊ व्हॅन जिल्ह्यात विविध ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत.


कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. गेल्या वीस दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दिवसभरात पोलीस कर्मचाºयांचा अनेक लोकांशी संपर्क येतो. या काळात त्यांना सुरक्षितता मिळावी व त्यांचे मनोबल वाढावे, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी मोटार परिवहन विभागाला अशा व्हॅन तयार करण्यास सांगितले होते. पोलिसांच्या नेहमीच्या व्हॅनमध्ये थोडा बदल करून सॅनिटायझेशन यंत्रणा बसविण्यात आली आहे. बॅटरीवरील एक पंप व स्प्रिंकल नोझलचा वापर करून ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. शिर्डी, संगमनेर, शेवगाव, कर्जत, नगर शहर, नगर ग्रामीण या उपविभागांना प्रत्येकी एक वाहन देण्यात आले आहे. श्रीरामपूर व नगरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दोन वाहने देण्यात आली आहेत. बंदोबस्त असलेल्या ठिकाणी ही वाहने नेण्यात येत आहेत. त्यात पोलीस कर्मचारी व अधिकारी दहा सेकंद गेल्यानंतर सॅनिटायझरची फवारणी होते. यासाठी महानगरपालिकेकडून औषधे पुरविण्यात येत आहेत.

“पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तनिमित्त नेहमी बाहेर असतात. त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सॅनिटायझेशन व्हॅन बनवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रत्येकी साडेतीन हजार रुपयांच्या खर्चात नऊ व्हॅन तयार करण्यात आल्या आहेत.” असे पोलीस परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक अमितकुमार लिगाडे यांनी सांगितले.


अधिक्षक कार्यालयात सॅनिटायझेशन टनल
पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकारी कर्मचाºयांसह कामानिमित्त येणा-या नागरिकांचा मोठा राबता असतो. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ आतील द्वाराजवळ दोन ठिकाणी सॅनिटायझेशन टनल उभारण्यात आले आहे. अधीक्षक कार्यालयात येणा-यांना या टनलमधून येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अशी बसविली यंत्रणा
निर्जंतुकीकरण व्हॅनमध्ये बॅटरीवर चालणारा १८ लिटर क्षमतेचा औषध फवारणीचा पंप बसविण्यात आला आहे. त्याला ५ नोझल पाइपद्वारे जोडून बटनाद्वारे आॅपरेट केला जातो. एका टँकमध्ये ५० ते ६० कर्मचाºयांचे निर्जंतुकीकरण केले जाते.

 

Web Title: Three and a half thousand sanitization vans: police administration initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.