...तर इतर पक्षांचा सुपडा साफ होईल, राजेंद्र नागवडे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:18 AM2021-02-07T04:18:49+5:302021-02-07T04:18:49+5:30

श्रीगोंदा : काँग्रेस पक्षाला त्याग आणि देशसेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनवले आहे. ...

... then the other parties will be wiped out, says Rajendra Nagwade | ...तर इतर पक्षांचा सुपडा साफ होईल, राजेंद्र नागवडे यांचे मत

...तर इतर पक्षांचा सुपडा साफ होईल, राजेंद्र नागवडे यांचे मत

Next

श्रीगोंदा : काँग्रेस पक्षाला त्याग आणि देशसेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनवले आहे. या वैभवशाली राज्याची धुरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर दिली तर इतर पक्षांचा सुपडा साफ होईल, असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले.

श्रीगोंदा येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या काँग्रेस बळकटीकरण कार्यक्रमात नागवडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार लहू कानडे म्हणाले, जाती-धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना फडकवून भाजपने सत्ता काबीज केली. मोदी सरकारने एलएआयसी, रेल्वे, विमानतळ विकायला काढली आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाचा दर ढासळला आहे.

आमदार सुधीर तांबे म्हणाले, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने निष्ठा, तत्व असलेले नेतृत्व मिळाले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाशी आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेशी बांधिलकी व संवाद ठेवला तर देशात सत्तांतर होऊ शकते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, बाबासाहेब भोस, आदेश शेंडगे यांनीही मनोगत व्यक्त केलेे.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, अरुण पाचपुते, समीर बोरा, बाबासाहेब इथापे, धनसिंग भोयटे, सुरेश लोखंडे, सतीश मखरे, हेमंत नलगे, राजेश लोखंडे, सीमा गोरे, निसार बेपारी, संतोष कोथिंबिरे, सुरेखा लकडे, गयाबाई सुपेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. अशोक रोडे यांनी केले तर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी आभार मानले.

Web Title: ... then the other parties will be wiped out, says Rajendra Nagwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.