शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

राज्य शासनाची कुपोषणमुक्ती : पोषण अभियानाचा खर्च ३०० कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 5:06 AM

पूरक पोषण आहार योजनेचा विस्तार करून केंद्र सरकारने मागील वर्षापासून पोषण अभियान हाती घेतले आहे.  

- साहेबराव नरसाळेअहमदनगर : पूरक पोषण आहार योजनेचा विस्तार करून केंद्र सरकारने मागील वर्षापासून पोषण अभियान हाती घेतले आहे.  या अभियानावर राज्यात २०१८-१९ या एका वर्षात सुमारे ३०० कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र, या अभियानातून सुरू केलेले रेडीफूड अद्यापही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाही.कुपोषणमुक्ती व बालमृत्यू रोखण्यासाठी १९७५ पासून एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत सरकरकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या़ त्यात लसीकरण, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, असे विविध उद्दिष्ट समाविष्ट होते़ जागतिक बँकेच्या मदतीने सुरू असलेली एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि पोषण सुधारणा प्रकल्पाचा १८ डिसेंबर २०१७ रोजी राष्ट्रीय पोषण मिशनमध्ये समावेश करण्यात आला़ तथापि, २५ मे २०१८ रोजी राष्ट्रीय पोषण मिशनचे नाव बदलून पोषण अभियान करण्यात आले़ त्याद्वारे सरकारने बालकांना आणि गरोदर मातांना रेडीफूड देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ३० व दुसऱ्या टप्प्यात ६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला़ बालके व गरोदर मातांना रेडीफूड पुरविण्यासाठी, तसेच प्रशिक्षण व आनुषंगिक बाबींसाठी केंद्राचा ८० टक्के व राज्याचा २० टक्के निधी खर्च करण्यात येत आहे़अंगणवाडीत येणाºया प्रत्येक बालकाला पूरक पोषण आहारातून रोज वेगवेगळा आहार पुरविला जातो़ तो पुरविण्यासाठी स्थानिक पातळीवरील बचत गटांना, तरनवीन पोषण अभियानातून रेडीफूडची पाकिटे पुरविण्याचा ठेका राज्यपातळीवरून नियुक्त केलेल्या संस्थेला देण्यात आला आहे़ रेडीफूडचा एकदम २० दिवसांचा साठा अंगणवाड्यांना पुरविण्यात येत आहे़ त्यामुळे काही अंगणवाड्यांपर्यंत रेडीफूड पोहोचला आहे, तर काही अंगणवाड्यांना अद्याप रेडीफूड मिळालाच नाही़सहा महिने ते ३ वर्षांची बालके आणि गरोदर मातांना हे रेडीफूड पुरविण्यात येते. ३ ते ६ वर्षांच्या बालकांना पूरक पोषण आहारदिला जातो.दूध, अंडी, चिक्की, केळी, खिचडी...६ महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बाळांना आणि गरोदर मातांना पूर्वी टेक होम रेशन (टीएचआर) योजनेतून शेवया, उपमा, शिरा यासाठीचे कच्चे अन्न पुरविले जायचे.ते शिजवून खावे लागत असे़ मात्र, आता त्याऐवजी थेट रेडीफूडची पाकिटे पुरविली जात आहेत़ अंगणवाडीत येणाºया ३ ते ६ वर्षांच्या बालकांना पूरक पोषण आहार योजनेतून तूर डाळीचा समावेश असणारी खिचडी, केळी, दूध, अंडी, चिक्की, राजगिरा लाडू असे पदार्थ आठवड्यातील एक वार ठरवून दिले जातात़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र