शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक : ६० उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 6:17 PM

श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवार ८ जानेवारीअखेर एकूण ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले.

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवार ८ जानेवारीअखेर एकूण ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात भाजपकडून २८, शिवसेनेकडून १०, राष्ट्रवादीकडून ६, काँग्रेसकडून ५, संभाजी ब्रिगेडकडून २ व अपक्षांकडून ९ अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार ९ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.प्रभाग क्रमांक एक, चार व पाचमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एबी फॉर्म देताना राजकीय राजकीय उलथापालथी होणार आहेत.प्रभाग पाचमध्ये उमेदवारीवरून संदीप खामकर, गोरख आळेकर, प्रभाग एकमध्ये उमेदवारीवरून कुमार लोखंडे, राजू लोखंडे, प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवारीवरून राजेश डांगे तर प्रभाग क्रमांक सहामध्ये सुनीता घोडके, तसेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये डॉ. सुवर्णा होले, उपनगराध्यक्षा अर्चना गोरे कमालीच्या नाराज आहेत. हे नाराज उमेदवार शेवटच्या टप्यात काय भूमिका घेतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहेनाहाटा, दरेकर भाजपमध्ये!प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपकडून बाळासाहेब नाहाटा यांचे बंधू नगरसेवक भारत नाहाटा यांची, तर प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रा. तुकाराम दरेकर यांचे चिरंजीव संतोष दरेकर यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित झाली आहे. त्यामुळे तुकाराम दरेकर, बाळासाहेब नाहाटा हे बबनराव पाचपुते यांच्या निवडणूक यंत्रणेत सक्रीय झाले आहेत. बुधवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगरपालिका परिसराला छावणीचे स्वरूप येणार आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन आहेर व तहसीलदार महेंद्र महाजन यांनी निवडणूक यंत्रणेला दिल्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा