शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

शिर्डीचे साई मंदिर बंद; आजपासून अनिश्चत काळासाठी बंद; ७९ वषार्नंतर साईसंस्थानच्या इतिहासातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 1:20 PM

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज सायंकाळपासून साईमंदिर बंद करण्याचा निर्णय साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने मंगळवारी (दि.१७ मार्च) घेतला.  भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक  पूजा, अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

शिर्डी : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज सायंकाळपासून साईमंदिर बंद करण्याचा निर्णय साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने मंगळवारी (दि.१७ मार्च) घेतला.  भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक  पूजा, अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.साई मंदिर बंद राहण्याची संस्थानच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे.  यापूर्वी १९४१ साली कॉलरामुळे ब्रिटिशांनी रामनवमी उत्सवात भाविकांसाठी मंदिर बंद ठेवले होते.  ८९ वर्षापूर्वीच्या निर्णयाची आजच्या निर्णयाने पुनरावृत्ती होत आहे.  ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. मंगळवारी दुपारी तीन नंतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद करण्यात येईल. शिर्डीत असलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारी प्रसादालय सुरू ठेवण्यात येईल. उद्या नास्ता पाकिटे सुरू राहतील.  भक्तनिवासही उद्या सकाळपर्यंत रिकामी करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ़ आकाश किसवे, रमेश उगले, गमे, औटी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, संरक्षण प्रमुख गंगावणे, आयटी प्रमुख अनिल शिंदे आदी उपस्थीत होते. साथीचा फैलाव टाळण्याच्या दृष्टीकोनातून व भाविकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेवून सामाजिक भान जपत मंदिर पुढील निर्णय होईपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या पंधरा दिवसात जगभरातील ३८ देशांतील ६२६ भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे. यात कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या चीन, इटली व स्पेनसह २१ देशातील २८६ भाविकांचा समावेश आहे. गेल्या पंधरा दिवसात चीन (४), इटली (६), फ्रान्स (१), स्पेन (३), नेदरलॅन्ड (४), आॅस्ट्रेलिया (१०), स्विर्त्स्झलॅन्ड (५), युनायटेड किंगडम (३९), युनायटेड स्टेट (१११) मधून आलेल्या विदेशी भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे.जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात चीनमधून (६), इटली (५),  फ्रान्स (२), स्पेन (४), आॅस्टेलिया (५१७), युनायटेड किंगडम (१७८), युनायटेड स्टेटस (१६७६), दुबई (१०३), जर्मनी (११५), युयेई (१३०), सिंगापूर (१६१) भाविक शिर्डीत येवून गेले आहेत.  ‘लोकमत’ने मंगळवारी विदेशी भाविकांची शिडीर्तील आकडेवारी समोर आणल्याने परिस्थितीचे गांभिर्य वाढले होते.....प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या आदेशानुसार मंगळवारचा आठवडेबाजार, मॉल, वॉटरपार्क, साईतीर्थ थीमपार्क, साईहेरीटेज व्हिलेज (जुनी शिर्डी) जीम, बंद ठेवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाcorona virusकोरोना