Shilpa Shetty's saibaba,darshan | शिल्पा शेट्टी यांचे साईदर्शन; आईसोबत केली साईबाबांची पाद्यपूजा 

शिल्पा शेट्टी यांचे साईदर्शन; आईसोबत केली साईबाबांची पाद्यपूजा 


शिर्डी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयासोबत शिर्डीतसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत तिची बहीण शमिता आणि पती राज कुंद्रा यांनीही साईदरबारी हजेरी लावली. शिल्पा आणि राज यांच्या आईने साई समाधी मंदिरात जाऊन साईंची पाद्यपूजा केली. 
साईदर्शन घेतल्यानंतर शिल्पा शेट्टी माध्यमांशी संवाद साधला. तब्बल १२ वषार्नंतर ती ‘निक्कम्मा’ आणि ‘हंगामा’ या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘सुपर डान्सर’ या कार्यक्रमाच्या परीक्षकाची भूमिका देखील पार पाडते आहे. या सर्व गोष्टींबद्दल साईंचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आल्याचे तिने यावेळी सांगितले. राज कुंद्रा यांनी शिल्पा शेट्टी यांना एक नवे नाव दिले आहे. बीबीसी असे हे नाव आहे. याबाबत विचारले असता  ‘बॉर्न बीफोर कंप्युटर’, असा याचा अर्थ आहे, असे शिल्पा यांनी सांगितले.
आगामी चित्रपटात सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘गाणं चुराके दिल मेरा’ या गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जनही पाहायला मिळणार आहे. पंचवीस वषार्नंतर हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे मी आनंदी आहे, असेही शिल्पा शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
साईदर्शनानंतर साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अ़धिकारी दीपक मुगळीकर यांनी सर्वांचा साईमूर्ती देऊन सत्कार केला.

Web Title: Shilpa Shetty's saibaba,darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.