शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

शरद पवारांकडून रोहित पवारांच्या उमेदवारीचे संकेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 2:21 PM

कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर शरद पवार म्हणाले, तुझी मागणी मान्य झाली बघ.’

जामखेड (अहमदनगर) : ‘रोहित दादांना उमेदवारी द्या, ते निवडून येतील,’ अशी मागणी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावर शरद पवार हसत ‘तुझी मागणी झाली’ असं रोहित पवार यांना म्हणाले.सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीड जिल्ह्यात दुष्काळी दौ-यावर जात असताना जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या निवासस्थानी काही वेळ थांबून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे, मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, सतिश शिंदे, माजी जि. प. अध्यक्ष शिवाजी राऊत, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, शरद भोरे, विश्वनाथ राऊत, कांतीलाल वाळूंजकर, नगरसेवक पवनराजे राळेभात, डिगांबर चव्हाण, अमित जाधव, लक्ष्मण ढेपे, प्रकाश काळे, ऊमर कुरेशी, अकबर तांबोळी, चंद्रशेखर नरसाळे, अजय कोठारी आदी उपस्थित होते.

जामखेड शहराला २० ते २२ दिवसांनी पिण्यासाठी नळावाटे पाणी पुरवठा होतो. मात्र, तेही पाणी अस्वच्छ असते, अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या़ त्यावर तुम्ही पुरावे द्या,पुढचे मी पाहतो, असे सांगत पवारांनी जामखेडचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.कोठारी यांच्या घरातून निघाल्यानंतर गाडीत बसलेल्या शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या उमेदवारीची मागणी केली़ त्यावेळी रोहित पवारही मागे बसलेले होते़ कार्यकर्त्यांची मागणीनंतर रोहितकडे पाहत ‘तुझी मागणी मान्य झाली, असे हसत हसत शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJamkhedजामखेडDhananjay Mundeधनंजय मुंडे