शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

प्रतिष्ठेच्या लढतीत शंकरराव गडाखांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 4:47 PM

नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपचे उमेदवार आमदार मुरकुटे यांचा तीस हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली.

नेवासा विधानसभा निवडणूक विश्लेषण - सुहास पठाडे । नेवासा : नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपचे उमेदवार आमदार मुरकुटे यांचा तीस हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली.मुरकुटे-गडाख यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होईल असा अंदाज होता. मात्र सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांची मोठी फळी, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग यांची मिळालेली साथ यामुळे गडाखांनी मुरकुटेंचा सहज पराभव केला.सतरा उमेदवार रिंगणात असूनही येथे सुरुवातीपासूनच गडाख-मुरकुटे यांच्यातच खरी लढत होती. गडाख यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न स्वीकारता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. येथे राष्टÑवादीने उमेदवार न देता गडाखांना पाठिंबा दिला. घुले बंधंूंनी त्यांची ताकद गडाख यांच्या पाठीशी उभी केली. त्यांच्यासाठी प्रचार सभाही घेतल्या. तालुक्यातील पाटपाण्याच्या कोलमडलेल्या नियोजनाचा मुद्दा गडाख यांनी प्रचारात प्रामुख्याने उचलला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात मोठी प्रचार यंत्रणा उभी केली. मोठ्या सभा घेण्याऐवजी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी पक्षात प्रवेश केला होता. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रशांत गडाख, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, उदयन गडाख यांनी गडाख यांच्या प्रचाराची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. प्रशांत गडाख यांनी सोशल मीडियावर विकासाच्या मुद्यावर केलेली ‘आमदार मुरकुटे उत्तर द्या’ ही ‘वेबसिरीज’ प्रभावी ठरली. २०१४ च्या निवडणुकीतील चूक सुधारण्यासाठी गडाख अगदी सुरुवातीपासूनच अलर्ट राहिले.मुरकुटे यांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा वगळता भाजपच्या सर्व नेत्यांनी मुरकुटे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी मुरकुटे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. मात्र त्याचाही काहीच फायदा झाला नाही. बेलपिंपळगाव, कुकाणा, भेंडा या भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गटातच मुरकुटेंना मताधिक्य मिळवता आले नाही. या गटात गडाख यांनी मोठी प्रचार यंत्रणा राबविली. सोनई, खरवंडी, चांदा हे गट गडाखांचे बलस्थान आहेत. त्यात गडाखांनाच आघाडी मिळाली. पहिल्या फेरीपासूनच गडाख यांनी आघाडीत कायम राखत शेवटच्या फेरी अखेर ३० हजार ६६३ मतांनी विजय संपादन केला. 

माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. सर्वप्रथम जनतेचे व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. गेल्या पाच वर्षात खूप त्रास झाला. मात्र ते सर्व विसरलो आहे. कार्यकर्त्यांनीही संकुचित वृत्ती न ठेवता मोठ्या मनाने झाले गेले विसरून जावे. मिळालेल्या संधीचा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी फायदा घेणार आहे. माझ्या राजकीय जीवनातील ही अतिशय अटीतटीची निवडणूक होती. त्यात यश मिळाल्याने समाधानी आहे, असे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.     

टॅग्स :nevasa-acनेवासाShankarrao Gadakhशंकरराव गडाख