तीन लाख भाविकांनी घेतले शनी दर्शन

By admin | Published: May 28, 2014 11:58 PM2014-05-28T23:58:58+5:302014-05-29T00:26:43+5:30

सोनई : नेवासा तालुक्यातील स्वयंभू श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे २ ते ३ लाख भाविकांनी यावेळेस शनी दर्शन घेतले.

Shani Darshan took three lakh devotees | तीन लाख भाविकांनी घेतले शनी दर्शन

तीन लाख भाविकांनी घेतले शनी दर्शन

Next

सोनई : नेवासा तालुक्यातील स्वयंभू श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे २ ते ३ लाख भाविकांनी यावेळेस शनी दर्शन घेतले. शनी जयंती सोहळ्यात शनी शिंगणापूर येथील ३५ ग्रामस्थांनी ४० दिवस सायकलवर प्रवास करून काशीहून गंगेचे पाणी आणले. कावडीतील गंगाजलाने शनीमूर्तीला गंगास्नान घालण्यात आले. दही-दुधाने अभिषेक घालून दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात आली. आरतीच्यावेळी लाखो भाविकांनी जयघोष केला. शनी चौथर्‍यावरती तसेच समोरील मठ मंदिर व मंदिर परिसरात दर्शनपथ, महाद्वार, भक्त निवास आदी ठिकाणी फुलांची सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शनी जयंतीनिमित्त महायज्ञाच्या हवनासाठी उपाध्यक्ष सोपानराव बानकर, विश्वस्त ज्ञानदेव दरंदले, रंगनाथ शेटे, राजेंद्र दरंदले, उद्योगपती रामेश्वर सोनी हे यज्ञपूजेत सहभागी झाले होते. (वार्ताहर)श्री संत जगतगुरू तुकाराम महाराज संस्थान नेवासा येथील महंत ह.भ.प. उद्धव महाराज नेवासकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. शनी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्ताने अनेक मान्यवरांनी शनीदर्शन घेतले. देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव दरंदले, विश्वस्त अ‍ॅड. सयाराम बानकर, नितीन शेटे, कोषाध्यक्ष पोपट शेटे, कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ यांच्यासह सर्व विश्वस्त व विविध विभाग प्रमुखांनी गेली आठ दिवस कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन केले. सलग आठ दिवसापासून मंदिर प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रम चालू होते. त्यात पहाटे काकड आरती, तुकाराम गाथा पारायण, सायंकाळी कीर्तन असे कार्यक्रम होते. काशीवरून आलेल्या कावडीचे मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी स्वागत केले. विविध वाद्यासह शनी महाराजांचा जयघोष करण्यात आला. शनी जयंतीनिमित्त झिम्बाव्वे येथील उद्योगपती जयेश शहा यांच्या वतीने देवस्थानच्या प्रसादालयात दिवसभर मोफत अन्नदान चालू होते. गुजरात राज्यातील सुरत शहरातील शनीभक्ताने ५ टन पोहे तयार करून मोफत वाटण्यात आले. रात्री श्री क्षेत्र देवगड येथील ह.भ.प. भास्करगिरी महाराजांचे कीर्तन झाले.

Web Title: Shani Darshan took three lakh devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.