शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

अहमदनगरच्या पर्यटन विकासाबाबत शासनाला आराखडा देणार- संग्राम जगताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:32 PM

अहमदनगर : नगर शहराच्या पर्यटन विकासाबाबत नागरिकांसोबत चर्चा करुन शासनाला सर्वांगीण आराखडा सादर केला जाणार आहे. पुढील काळात हरित नगर व पर्यटनासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

अहमदनगर : नगर शहराच्या पर्यटन विकासाबाबत नागरिकांसोबत चर्चा करुन शासनाला सर्वांगीण आराखडा सादर केला जाणार आहे. पुढील काळात हरित नगर व पर्यटनासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

नगरच्या पर्यटन विकासाबाबत जगताप यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली आहे. या निधीसाठी शासनाकडे आराखडा सादर करावयाचा आहे. हा आराखडा सादर करण्यासाठी जगताप व रसिक ग्रुपचे संस्थापक जयंत येलूलकर यांच्या पुढाकारातून शनिवारी निमंत्रित व्यक्तींची एक बैठक बोलविण्यात आली होती. 

या बैठकीत अवतार मेहरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर, प्रकाश छजलानी, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे, महेंद्र कुलकर्णी, आदेश चंगेडिया, गौतम मुनोत, रफिक मुन्शी, प्रियदर्शन बंडेलू, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष सलीम शेख, मेहेर तिवारी, स्वप्नील मुनोत, सीताराम काकडे, विशाल लाहोटी, नगरसेवक गणेश भोसले, श्रीनिवास बोज्जा, नगर रायझिंगचे संदीप जोशी, पुष्कर तांबोळी आदींनी नगरच्या पर्यटन विकासाबाबत विविध सूचना   मांडल्या.  जगताप म्हणाले, नगर शहर कचराकुंडीमुक्तीकडे वाटचाल करत आहे. स्वच्छतेतही आपण चांगली प्रगती करत आहोत.

आपण विधानसभेत प्रश्न मांडल्यानंतर सीनानदी अतिक्रमण मुक्त होत आहे. पर्यटन विकास होण्यासाठी आता सरकारकडे आराखडा सादर केला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांची मते विचारात घेणार आहोत. पर्यटन व सांस्कृतिकदृष्ट्या शहर संपन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रारंभी येलूलकर यांनी बैठकीमागील हेतू विशद केला. माणिक विधाते, अण्णाशेठ मुनोत, भूषण देशमुख, संजय चोपडा, श्रीकांत मांढरे, रमेश जंगले, सुदर्शन कुलकर्णी, ऋषीकेश येलूलकर यांची उपस्थित होती. 

मान्यवरांनी सूचविले  विविध प्रकल्प पर्यटन विकासासाठी बैठकीत विविध सूचना मांडण्यात आल्या. पर्यटकांना आकर्षितकरण्यासाठी शहरात स्वच्छता बाळगावी. पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत अभियंते, वास्तुविशारद तसेच नागरिकांकडून मते व कल्पना मागवाव्यात. आमदार व खासदार निधीतील काही हिस्सा ठरवून पर्यटन विकासावर खर्च करावा. भुईकोट किल्ला सुशोभित करुन तेथे लेझर शो व उद्यान विकसित व्हावे. शहरातील चौक लोकसहभागातून सुशोभित करावेत. दरवर्षी एक ापर्यटनस्थळावर लक्ष केंद्रित करुन त्याचा सर्वांगीण विकास करावा. सिनेमा व मालिकांच्या चित्रीकरणासाठी नगर शहराजवळ चित्रनगरी निर्माण करावी. पर्यटन विकासाबाबत जगभर असणाºया नगरकरांची मदत घ्यावी, आदी सूचनांचा त्यात समावेश आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरtourismपर्यटन