वाळूच्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला उडवले; आष्टी तालुक्यातील तरुण जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:43 PM2020-07-16T13:43:39+5:302020-07-16T13:44:11+5:30

हळगाव (जि. अहमदनगर ) : जामखेड तालुक्यातील अरणगाव - कवडगाव रस्त्यावर वाळूच्या ट्रॅक्टरने एका मोटारसायकलला धडक दिली. गुरूवारी दुपारी ...

The sand tractor blew up the motorcycle; Young man from Ashti taluka killed on the spot | वाळूच्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला उडवले; आष्टी तालुक्यातील तरुण जागीच ठार 

वाळूच्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला उडवले; आष्टी तालुक्यातील तरुण जागीच ठार 

Next

हळगाव (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील अरणगाव - कवडगाव रस्त्यावर वाळूच्या ट्रॅक्टरने एका मोटारसायकलला धडक दिली. गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास शिंदेवस्ती (अरणगाव) परिसरात ही घटना घडली.

 

या घटनेत एक तरूण जागीच ठार झाला आहे. तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. महेश हरिदास झांबरे ( हिंगणी, ता. आष्टी, जि. बीड) असे मयत तरूणाचे नाव आहे. तर एका जखमी तरूणावर अरणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केले जात आहेत.


गंभीररित्या जखमी तरूणाला पुढील उपचाराला हलवण्यासाठी १०८ सेवेच्या अ‍ॅम्ब्युलन्स गाडीसाठी वारंवार संपर्क करूनही मागील तासाभरापासुन सदर गाडी अजुनही अरणगावमध्ये दाखल झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अरणगाव प्राथमिक केंद्राला कायमस्वरूपी १०८ सेवेची एक अ‍ॅम्ब्युलन्स असणे आवश्यक आहे. यासाठी वारंवार मागणी करण्यात आली. मात्र आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे युवा नेते अंकुश शिंदे यांनी सांगितले.

Web Title: The sand tractor blew up the motorcycle; Young man from Ashti taluka killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.