शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

पावसामुळे ऊस, कडब्याची विक्री घटली; जनावरांना चारा झाला मुबलक, फोनवरच चा-याची बुकिंग 

By अनिल लगड | Published: July 19, 2020 4:07 PM

अहमदनगर : चालू वर्षी गेल्या दोन महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे सध्या खरिपाची पिकेही जोमात आहेत. पावसामुळे वने, पडीक जमिनी हिरव्यागार झाल्या आहेत. त्यात मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. अनेक शेतक-यांनाही घरचा चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सध्या बाजारात ऊस, मका, कडवळ, कडब्याला मागणी घटली आहे. 

नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी गायी, म्हशी पालनातून दूध धंदा  करतात. यासाठी दूध उत्पादकांंना जनावरांच्या चा-याची मोठी गरज भासते. गेल्या काही वर्षात अनेक वेळा दूध उत्पादक शेतक-यांना दुष्काळाशी मोठा सामना करावा लागला. यात जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी शेतक-यांची मोठी दमछाक झाली. यात मोठा आर्थिक तोटाही सहन करावा लागला. यासाठी मार्केटमधून किंवा शेतक-यांच्या थेट शेतातून जनावरांना चारा खरेदी करावा लागला. परंतु यंदा मे महिन्यातच पाऊस चांगला झाल्याने जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सध्या चा-याला मागणी घटली आहे. कोरोनामुळे दोन महिने मार्केट बंद होते. यामुळे चारा विक्रीसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. या काळात मोबाईलवरुनच चा-याची खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. अनेक शेतकरीही चारा विक्रेत्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे शेतक-यांने संपर्क केला की चाºयाचे वाहन थेट उपलब्ध करुन दिले जात होते. सध्या बाजारात ऊस, मका, कडवळाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. पण मागणी नसल्याने भाव घटले आहेत. तर कडब्याची आवक कमी होत आहे. यंदा वर्षभर चा-याला मागणी कमी राहील, असे चारा विक्रेत्यांनी सांगितले.

 चा-याचे भाव असे...१)ऊस : २००० ते २५०० रुपये टन२)मका : १५०० ते १६०० रुपये टन३)कडवळ : १५०० ते १६०० रुपये टन४)कडबा : १५०० ते १६०० रुपये टन(शेकड्यात कडबा बारीक साईज-८०० ते १०००, मोठा कडबा-१५०० ते २०००).

यंदा पाऊस पाणी चांगला झाला आहे. सर्वत्र जनावरांसाठी घरचा चारा उपलब्ध झाला आहे. अनेक शेतक-यांकडे स्वत:चा कडबा देखील उपलब्ध आहे.   

 -सुभाष देशमुख, पाथर्डी.

गेल्या दोन महिने कोरोनामुळे चारा विक्रीसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु आता चारा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. पण, चा-याला मागणी नसल्याने भाव कमी आहेत. उसाची आवक मोठी आहे. कडब्याची आवक कमी आहे. त्यामुळे कडब्याचे भाव टिकून आहेत.

-आप्पासाहेब बारसे, व्यापारी, अहमदनगर. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसcowगायAgriculture Sectorशेती क्षेत्र