शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 7:20 AM

शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले.

शिर्डी/पाथरी: शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रात्री १२नंतर शिर्डी बंद तात्पुरता मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी शिर्डीकरांच्या ग्रामसभेच्या मान्यतेने केली.साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरून संतापलेल्या शिर्डीकरांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. रविवारी शिर्डी कडकडीत बंद होती. फुला-हारांची दुकाने बंद असल्याने भाविकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. रविवारी साईभक्त व ग्रामस्थांनी शहरातून सद्भावना परिक्रमा रॅली काढली. त्यामध्ये शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थही सहभागी झाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी (जि. परभणी)चा उल्लेख साई जन्मस्थळ असा केल्याने शिर्डीत संताप व्यक्त झाला. हे विधान मागे घेईपर्यंत शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी शनिवारी घेतला होता. पंचक्रोशीतील २५ गावांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. सकाळी द्वारकामाई मंदिरासमोरून सद्भावना परिक्रमा रॅली काढली. रॅली साईमंदिराच्या बाहेर आल्यावर साईबाबांची आरती झाली. रॅलीचा समारोप मारुती मंदिराजवळ झाला. या वेळी साईबाबांचा जयघोष करून घंटानाद केला. शिर्डीत दुकाने, रेस्टॉरंट बंद असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सामाजिक संघटना, मुस्लीम बांधवांनी नाश्ता, बिस्कीट, पाणी यांचे भाविकांना वाटप केले. बंदमुळे भाविकांवर कोणताही परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणे लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले. दर्शनही सुरळीत झाले. भाविकांच्या जेवणाची व राहण्याची, सुरक्षेची व्यवस्था साईसंस्थानने ठेवली.अभ्यास गट नेमला जाण्याची शक्यतापाथरी (जि. परभणी) हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा दावा पाथरी ग्रामस्थांचा आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ ते विविध ग्रंथांतील २९ पुरावे सादर करणार आहेत. तर दुसरीकडे, साईबाबांनी आपल्या हयातीत जन्मस्थळ, जात-धर्म आणि वंशाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. म्हणूनच सर्वधर्मीय त्यांचे भक्तगण आहेत, असे शिर्डीकरांचे म्हणणे आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक अभ्यास गट नेमणार असून त्यांना सहा महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात येणार असल्याचे समजते.लक्ष आजच्या बैठकीकडेहा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना सोमवारी दुपारी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होईल. शिर्डी ग्रामस्थ, साई संस्थानचे अधिकारी, पाथरी येथील कृती समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. मात्र, या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे पाथरी येथील कृती समितीने म्हटले आहे.पाथरीत भक्तांची गर्दीया वादामुळे देशातील मीडियात पाथरी शहर गाजत आहे. त्यामुळे पाथरीतही भाविकांची गर्दी वाढत आहे. रविवारी सकाळपासूनच राज्यासह राज्याबाहेरील भाविकांची पाथरीत झुंबड उडाली होती.

टॅग्स :shirdiशिर्डीsaibabaसाईबाबा