शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मंदिरे फोडणारी टोळी गजाआड : राहुरी पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 1:06 PM

राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी, मानोरी व उंबरे येथील देवींची मंदिरे फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात राहुरी पोलिसांना अखेर साडेतीन महिन्यानंतर यश आले.

ब्राह्मणी/वांबोरी : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी, मानोरी व उंबरे येथील देवींची मंदिरे फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात राहुरी पोलिसांना अखेर साडेतीन महिन्यानंतर यश आले.सदर मंदिरे फोडण्याची घटना १५ मे च्या रोजी घडली होती. घटना घडल्यानंतर पाच दिवसांनी राहुरी पोलीस नगर-मनमाड महामार्गावर गस्त घालताना एका संशयीत टोळीचा पाठलाग करून एक जण पकडला होता. त्याची चौकशी केली असता आकाश ज्ञानदेव पवार (रा.देहरे) असे नाव त्याने सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन तपास केला असता सदर गुन्हा संदीप बबन बर्डे, सचिन माळी, संदीप मोहन गांगुर्डे, शंकर बर्डे सर्व (रा.देहरे), रमेश माळी (रा.मानोरी) यांनी केल्याची कबुली आकाश पवार याने दिली. त्यांनी ब्राह्मणी, उंबरे, मानोरीसह देवळाली प्रवरा व एमआयडीसी हद्दीतील मंदिरांची चोरी केल्याचे चौकशीत उघड झाले. तपासादरम्यान संदीप बर्डे यास अटक करण्यात आली. मंदिर चोरीतील मुद्देमाल हा सुजित नवनाथ पवार (रा.खडांबे खुर्द) याच्याकडे ठेवला असल्याचे बर्डे याने सांगितले. दरम्यान सुजित पवार याच्यासह देवीची नथ, मुकुट व चांदीचे दागिने आदी मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. सदर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, तपासी अधिकारी सतीष शिरसाठ, पोलीस कर्मचारी शैलेश सरोदे, पथवे ,कोळगे, रवींद्र मेढे, सुनील शिंदे यांनी केला.आणखी चार जणांचा शोध सुरूसदर चोरीच्या गुन्ह्यातील चार जण अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध राहुरी पोलिसांकडून सुरू आहे. एमआयडीसी परिसरातील मंदिर फोडल्याच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे फौजदार सतीश शिरसाठ यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस