राजापूरचे नव्वद वर्षांचे "तरुण" घोडेस्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:46 AM2020-12-11T04:46:38+5:302020-12-11T04:46:38+5:30

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील सखाराम नामदेव पोटावळे हे नव्वद वर्षांचे ''तरुण'' घोडेस्वार दैनंदिन कामे आपल्या लाखमोलाच्या घोड्यावरून ...

Rajapur's ninety year old "young" horseman | राजापूरचे नव्वद वर्षांचे "तरुण" घोडेस्वार

राजापूरचे नव्वद वर्षांचे "तरुण" घोडेस्वार

Next

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील सखाराम नामदेव पोटावळे हे नव्वद वर्षांचे ''तरुण'' घोडेस्वार दैनंदिन कामे आपल्या लाखमोलाच्या घोड्यावरून करीत आहेत. लहानपणापासून त्यांनी घोडेस्वारीचा छंद जोपासला आहे.

पोटावळे कामानिमित्ताने किंवा नातेवाइकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी शिरूर, देवदैठण, निंबवी, ढवळगाव, म्हसा व इतर ठिकाणी प्रवास करताना घोड्याचाच वापर करतात. पोटावळे हे नेहरू, धोतर, फेटा व कोल्हापुरी चपला असा पोषाख परिधान करून घोड्याला टाच मारून भरधाव वेगात प्रवास करतात.

सध्या वापरत असणारा घोडा उंच, रुबाबदार व आकर्षक आहे. तो दोन वर्षांपूर्वी माळेगाव येथून एक लाख रुपयांना पोटावळे यांनी खरेदी केला आहे. सध्याच्या काळात दळवळणासाठी वाहनांची रेलचेल असताना देखील पोटावळे हे घोड्यावरून अनेक ठिकाणी प्रवास करणे पसंद करतात.

....

सेलिब्रेटीबरोबर सेल्फी

पूर्वी प्रवासासाठी सर्रास घोडे वापरले जात; पण आजच्या काळात घोड्यावर बसणे, घोडेस्वारी करणे हे आजोबा लिलया करतात. त्यामुळे त्यांची घोडदौड सुरू असताना लोक त्यांच्याकडे पाहतच राहतात. अनेक जण अशा सेलिब्रेटीबरोबर सेल्फी देखील काढतात. त्यांच्याकडे पाहून ‘फिट’ असणाऱ्या या नव्वदीच्या तरुणाचा फिटनेस नजरेत भरतो.

..

०९घोडेस्वार

Web Title: Rajapur's ninety year old "young" horseman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.