शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

गौतम हिरण यांची हत्या हे गृहविभागाचे अपयश; राधाकृष्ण विखे यांची टीका, अधिवेशनात उमटले पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:07 PM

बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येवरून विधानसभेत विरोधी भारतीय जनता पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर सोमवारी टिकेची झोड उठविली आहे. विखे यांनी या घटनेवर गृहमंत्र्यांना तातडीने निवेदन सादर करण्याची मागणी केली.

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येवरून विधानसभेत विरोधी भारतीय जनता पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर सोमवारी टिकेची झोड उठविली आहे. विखे यांनी या घटनेवर गृहमंत्र्यांना तातडीने निवेदन सादर करण्याची मागणी केली.

अधिवेशनात दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी हिरण यांच्या हत्येचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी यावेळी घटनेचा काही तपशील मांडला. सोमवारी विखे यांनी गृहखात्याचे सरकारवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलीस सामान्यांवर धाक दाखवत आहेत. मात्र गुंड मोकाट राहिल्याचे ते म्हणाले. 

हिरण यांचे अपहरण झाल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला व्यापा-यांनी सर्व माहिती दिली होती. जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याबाबत गांभीर्य दाखविले गेले नाही. हिरण यांचे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे अशा कुटुंबातील व्यक्तीची हत्या खेदनजनक आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावावा. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर निवेदन सादर करावे, अशी मागणी अशी विखे यांनी केली. 

पोलिसांच्या कामगिरीवर आमचा आक्षेप नाही. मात्र मूठभर लोकांमुळे गृहखाते बदनाम होत आहे. हिरण यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. आता मागे जाता येणार नाही. मात्र पुढील काळात अशा प्रकारची कोणतीही घटना घडता कामा नये याची खबरदारी घेतली जावी असे विखे म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलCrime Newsगुन्हेगारीVidhan Bhavanविधान भवन