Public Prosecutor withdraws from Indorikar Maharaj case | इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलाची माघार

इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलाची माघार

संगमनेर(जि.अहमदनगर) :  वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल असलेले निवृत्ती काशिनाथ देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्या खटल्यातून सहायक सहकारी अभियोक्ता अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांनी माघार घेतली आहे. 

या प्रकरणाचे काम पाहण्याची इच्छा नसून माझी बदनामी करणाऱ्यांना नोटीस पाठविणार असल्याचे अ‍ॅड. कोल्हे यांनी सांगितले. इंदोरीकर महाराजांविरोधात फिर्याद दाखल करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. कोल्हे काम पाहत आहेत. त्यांनी मला हे काम पाहण्याची इच्छा नसल्याचे कार्यालयाला लेखी कळविले आहे. याबाबत अ‍ॅड. कोल्हे यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

Web Title: Public Prosecutor withdraws from Indorikar Maharaj case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.