शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 9:26 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते साईसमाधी शताब्दीचा समारोप व विविध कामांचे भुमीपुजन केले जाणार आहे.

शिर्डी: पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते साईसमाधी शताब्दीचा समारोप व विविध कामांचे भुमीपुजन केले जाणार आहे. यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात येणार आहे. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी विमानतळावर उतरतील. तेथून ते हेलिकॉप्टरने शिर्डी संस्थानच्या हॅलिपॅडवर येतील. तेथून साईबाबा मंदीरात दर्शन व पूजा करतील. त्यानंतर शेजारील लेंडीबागेतील शताब्दी ध्वज उतरवतील. त्यानंतर सभास्थली येऊन विविध कामांचे व्हिडीओ कॉन्फरसिंगने भुमीपुजन करतील. पतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात येणार आहे. संस्थानच्या दर्शनबारी, शैक्षणिक संकुल, साईगार्डन व नॉलेज पार्क व सोलर प्रोजक्टचे सांकेतीक भुमीपुजन पंतप्रधान मोदी करतील.या पार्श्वभुमीवर पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेवून १९ वाहन तळे तयार करण्यात आली आहेत. पोलीस अधिक्षक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ९ अतिरीक्त पोलीस अधिक्षक, १७ उपअधिक्षक, ५० निरीक्षक, १५० सहाय्यक व उपनिरीक्षक आणि २५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दहशतवाद विरोधी पथकाच्या चार टिम, बॉम्ब शोध पथकाच्या ९ टिम, शिघ्रकृती दलाची आठ पथके, दंगल नियंत्रणाची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. महत्वाच्या ठिकाणी अडीचशे कॅमेरे तसेच २५ व्हिडीओ कॅमेरे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत आहेत.याशिवाय नगर ते मनमाड दरम्यानची जड वाहतुक नगरच्या बाजुने कोल्हारपासून व मनमाडच्या बाजूने पुणतांबा फाट्यावरुन वळविण्यात आली आहे. भाविक किंवा स्थानिक नागरीकांची राहात्याकडून येणारी वाहने आरबीएल चौक-भाजी मंडई ते साईश कॉर्नर व कोपरगावकडून येणारी वाहने सावळेविहीर-रूई मार्गे शिर्डीत आणण्यात येत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी