टोमॅटोवरील माव्याचा प्रादुर्भाव रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:25 AM2021-02-25T04:25:08+5:302021-02-25T04:25:08+5:30

अकोले तालुक्यातील वीरगावच्या विश्व हायटेक नर्सरीला डॉ. रेड्डी यांनी मंगळवारी भेट दिली. यानंतर त्यांनी टोमॅटो पिकाला घातक ठरलेल्या सीएमव्ही ...

Prevent the spread of aphids on tomatoes | टोमॅटोवरील माव्याचा प्रादुर्भाव रोखा

टोमॅटोवरील माव्याचा प्रादुर्भाव रोखा

Next

अकोले तालुक्यातील वीरगावच्या विश्व हायटेक नर्सरीला डॉ. रेड्डी यांनी मंगळवारी भेट दिली. यानंतर त्यांनी टोमॅटो पिकाला घातक ठरलेल्या सीएमव्ही (कुकूंबर मोझॅक व्हायरस) रोगाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, डॉ. रमेश मोहाळे, दिनेश भोईटे, शशिकांत कराळे, विश्व हायटेक नर्सरीचे संचालक नानासाहेब थोरात, वीरेंद्र थोरात, शांताराम गजे हे उपस्थित होते. विश्व हायटेक नर्सरी बघितल्यानंतर मी भारावून गेलो आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि आदर्श व्यवस्थापनाने याठिकाणी रोपांचे होणारे सृजन महाराष्ट्र आणि बाहेरच्या राज्यातही हरितक्रांतीला हातभार लावीत आहे. टोमॅटोवरील सीएमव्ही व्हायरस प्रतिबंधात्मक उपायांसाठी बॉर्डर क्रॉप म्हणून मका लावणे, चिकट सापळे लावणे किंवा क्रॉप कव्हर आदी उपाययोजना आवश्यक ठरतील. एका पिकावर लगेच दुसरे पीक घेतल्याने जमिनीला विश्रांती मिळत नाही. पीक फेरपालट गरजेचा असून टोमॅटोनंतर शेंगावर्गीय किंवा द्विदलवर्गीय पिके घ्यावीत. बनावट व चुकीचे कीटकनाशक बाजारात मिळते आणि आमचे औषध विषाणूला मारते असा चुकीचा दावा केला जातो. परंतु विषाणू कशानेही मरत नाही. माव्याचा प्रादुर्भाव रोखून या विषाणूचे व्यवस्थापन करण्यात येते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असून तो सुधारणे गरजेचे असून सकस जमीनच आता यापुढे पिकांचे रोगापासून रक्षण करेल, असेही डॉ. रेड्डी म्हणाले.

Web Title: Prevent the spread of aphids on tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.