Police have registered a case against three shopkeepers | तीन दुकानदारांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

तीन दुकानदारांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

टाकळीभान, ( वार्ताहर ) श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन
न करता वेळेच्या आधी दुकाने उघडून आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तीन दुकानदारांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
       टाकळीभान येथे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशा नुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यात येत आहेत. मात्र आज सोमवार दिनांक ६ जुलै रोजी सकाळी किराणा दुकानदार रविंद्र भालसिंग, जनरल स्टोअर्स दुकानदार बहिरूसिंग परदेशी व फुटवेअर दुकानदार झिंजुर्डे यांनी वेळे अधी दुकाने उघडल्याने या तीन दुकांनदारांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.


टाकळीभान ग्रामपंचायतने सोमवारचा बाजार बंद
राहणार असून दुकानदारांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन करावे असे अलाव्हसिंग गावात रिक्षा फिरून ध्वनीक्षेपकाद्वारे केले होते. तरीही या तीन दुकांनदारांनी वेळेच्या आधी दुकाने उघडून आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी या तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहे. 

Web Title: Police have registered a case against three shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.