शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

कोपरगावमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश : पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 6:31 PM

भोंदूगिरी करून देवाच्या नावाखाली लोकांना लिंबू चौकी, धागेदोरे, धूूप, अंगारा देवून अंधश्रद्धेला खतपाणी घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

कोपरगाव : भोंदूगिरी करून देवाच्या नावाखाली लोकांना लिंबू चौकी, धागेदोरे, धूूप, अंगारा देवून अंधश्रद्धेला खतपाणी घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी मुर्शतपूर (ता. कोपरगाव) येथील म्हसोबानगर येथून शिवा प्रकाश भालेराव या भोंदूबाबाला अटक केली आहे. याप्रकरणी उद्धव अशोक काळापहाड (रा. साईनगर तपोवन रोड, अहमदनगर) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीची बहीण पुष्पा हिचे सासरे तुकाराम यांना विचित्र स्वप्न पडत होते. त्यामुळे ते म्हसोबानगर मुर्शतपूर येथील भोंदूबाबा शिवाप्रकाश भालेराव याच्याकडे नियमितपणे जात असत. त्यानंतर मेव्हणे अनिल यांच्या पोटात दुखू लागले. बहिणीचे सासरे तुकाराम यांनी मेव्हणे अनिल यास भोंदूबाबा शिवाप्रकाश यांच्याकडे उपचारासाठी घेवून गेले. त्यावेळी भोंदूबाबाने ‘तुम्हाला सासरच्या मंडळींनी दिवाळीच्या काळात जेवणातून काहीतरी खाऊ घातले आहे. त्यामुळे तुमचे पोट दुखत आहे’, असे सांगितले. त्यांना लिंबू चौकी देऊन तुम्ही बरे व्हाल असे सांगितले. त्यानंतर या प्रकारामुळे फिर्यादीच्या बहिणीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी गुरूवारी सकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत नागरे, पोलीस नाईक सुरेश देशमुख, हर्षवर्धन साळवे, मुकूंद शिरसाठ, शैलेश शिंदे त्याच्या मठात रुग्ण म्हणून गेले. गुरूवार असल्यामुळे तेथे मुंबई, पुणे, नाशिक येथून मोठ्या संख्येने रुग्ण आले होते. भोंदूबाबा प्रत्येकाला धागे, दोरे, लिंबू चौकी, अंगारा देत उदी खावून घ्या. तुम्हाला गुण येईल. पुढच्या गुरूवारी परत या, असे तो रुग्णांना सांगत असे. यावेळी पोलीस नाईक सुरेश देशमुख यांनी या घटनेचे चित्रिकरण केले. हा भोंदूबाबा अंधश्रद्धेला खतपाणी घालून बुवाबाजी करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे यावेळी दिसून आले, असे फर्यादीत म्हटले आहे....तो गयावया करू लागलापोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेतले. त्यानंतर तो गयावया करू लागला. ‘माझ्या अंगात येत नाही. मी फक्त उदी देतो, असे म्हणून मला माफ करा’, अशी याचना पोलिसांपुढे करू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव