शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

मत्स्यमारीसाठी अहमदनगर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट : महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 5:08 PM

मत्स्यमारीतून उत्कर्ष व्हावा म्हणून जपान तंत्रज्ञानाच्या फायबर बोटी देऊन नगर जिल्ह्यातून पायलट प्रकल्प सुरू केला जाईल. मागेल त्याला मत्स्यबीज देण्यात येणार असून प्राधान्याने सबसीडी देण्यात येईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यउद्योग मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

राहुरी: मत्स्यमारीतून उत्कर्ष व्हावा म्हणून जपान तंत्रज्ञानाच्या फायबर बोटी देऊन नगर जिल्ह्यातून पायलट प्रकल्प सुरू केला जाईल. मागेल त्याला मत्स्यबीज देण्यात येणार असून प्राधान्याने सबसीडी देण्यात येईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यउद्योग मंत्री महादेव जानकर यांनी दिली.राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या सभागृहात राजश्री शाहू महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन व जलाशयात पिंजरा पध्दतीने मत्स्यपालन याविषयावर आज प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली़ त्यावेळी जानकर बोलत होते.जानकर म्हणाले, जिल्ह्यात मत्स्यव्यवसायातून एक लाख लोकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. दुस-या राज्यातून मत्स्यबीज आणण्याचे उद्योग बंद करायचा असून पुढील वर्षी अन्य राज्यांना मत्स्यबीज पुरविण्यात येईल़ लवकरच मत्स्यशेतीबाबत महाराष्ट्र देशात एक क्रमांक राहील, असेही त्यांनी सांगितले़ मत्स्यबीज सेंटरसाठी २२ हजार कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे़ इथून पुढे जे आधिकारी योजना राबविण्यात कुचराई करतील त्यांची गडचिरोलीत बदली करू व इंक्र ीमेंट रोखून धरू असा इशाराही महादेव जानकर यांनी दिला.  मत्स्यव्यवसायानेच दीडपट उत्पन्न वाढणार आहे. कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली असून राज्य शासन खरेदीची हमी घेईल अशी ग्वाहीही जानकार यांनी दिली.थांबा कारवाईच करतोमहादेव जानकर यांचे संत गाडगे महाराज आश्रम शाळेत आगमन झाले. शनिवार असल्याने विद्युत पुरवठा बंद होता. विज का बंद आहे. मी येणार म्हणून अधिका-यांना माहीत नव्हते का, थांबा कारवाईच करतो अशी धमकी जानकर यांनी दिली. स्पीकरला येणा-या व्यत्ययाबाबतही आधिका-यांची त्यांनी खरडपटटी केली. तुमचे कायम असेच असते असे सांगत पुन्हा गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीMahadev Jankarमहादेव जानकर