शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

वडिलांच्या उपचारासाठी धावणाऱ्या मुलींचे फिरोदियांनी घेतले पालकत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 5:50 AM

उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या पाठबळामुळे भंडारी भगिनींच्या जिद्दीला मोठे बळ

अहमदनगर : धावण्याच्या विविध स्पर्धेत भाग घेऊन मिळविलेल्या बक्षिसांच्या रकमेतून वडिलांचा उपचार करणाऱ्या अळकुटी येथील भंडारी भगिनींचे संपूर्ण पालकत्व येथील शांतिकुमार फिरोदिया मेमोरिअल फौंडेशनने स्वीकारले आहे. याशिवाय वडिलांवर उपचार करण्याची जबाबदारीही घेतली आहे. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या या पाठबळामुळे भंडारी भगिनींच्या जिद्दीला मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे शीतल, साक्षी आणि भाग्यश्री भंडारी या भगिनी आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेऊ शकणार आहेत. ‘लोकमत’मध्ये त्यांच्या जिद्दीची कैफियत मांडली होती. आमच्यावरील मोठा ताण हलका झाला आहे. आता आम्ही खेळाकडे निश्चितच लक्ष केंद्रित करू. तसेच ऑलिम्पिकमध्ये नक्कीच सुवर्णपदक मिळवू. हेच आमचे ध्येय आहे. - शीतल, भाग्यश्री भंडारी, धावपटू‘क्षमता असेल तर जिंकणारच’ हे ध्यानात घेऊन मुलींनी मेहनत करावी. आता त्यांना कोणताही ताण-तणाव घेण्याची गरज नाही. त्यांच्या वडिलांचा संपूर्ण उपचार करण्याची जबाबदारी मी स्वत: घेतली आहे. - नरेंद्र फिरोदिया, उद्योजक