विकासासाठी जनतेनेच निवडणूक हाती घेतली-प्राजक्त तनपुरे; बारागाव नांदूरला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 04:54 PM2019-10-18T16:54:36+5:302019-10-18T16:55:12+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार दौ-यामुळे जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. राहुरी मतदार संघात हक्काचे पाणी व विकासासाठी माझा विजय निश्चित आहे. शिवाजी कर्डिले यांचा पराभव कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

The people took the election for development - Prajakat Tanpure; Meeting with Baragaon Nandur |  विकासासाठी जनतेनेच निवडणूक हाती घेतली-प्राजक्त तनपुरे; बारागाव नांदूरला सभा

 विकासासाठी जनतेनेच निवडणूक हाती घेतली-प्राजक्त तनपुरे; बारागाव नांदूरला सभा

Next

राहुरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार दौ-यामुळे जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. राहुरी मतदार संघात हक्काचे पाणी व विकासासाठी माझा विजय निश्चित आहे. शिवाजी कर्डिले यांचा पराभव कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. बारागाव नांदूर येथील सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंढरीनाथ पवार होते.
तनपुरे म्हणाले, राहुरी मतदारसंघात मोठे पाठबळ लाभले. तरुणाई एकवटली असून मतदारांचा उत्साह पाहता लोकांचा आमदार कर्डिले यांच्या विरोधात उद्रेक दिसत आहे. २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा होत असताना आमदार कर्डिले हे सत्तेत असल्याचे विसरले. तुमच्या हक्काच्या पाण्यासाठी मी संघर्ष करणार आहे.
गोविंद मोकाटे म्हणाले, आमदारांनी जनतेची निराशा केली.  प्राजक्त तनपुरे यांचा विजय निश्चित आहे. प्रकाश देठे म्हणाले, शिवाजी गाडे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीवेळी कर्डिले यांनी केलेला अपमान राहुरीकर विसरणार नाहीत. मागील काळात झालेल्या सर्व चुका विसरून राहुरी तालुक्याचा आमदार करू. याप्रसंगी रोहिदास कर्डिले, शशिकांत गाडे, मच्छिंद्र गाडे, ज्ञानेश्वर बाचकर, प्रभाकर गाडे, सत्यवान पवार यांनी मनोगत व्यक्त केले. 
व्यासपीठावर रोहिदास कर्डिले, सत्यवान पवार, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, प्रभाकर गाडे, श्रीराम गाडे, जगन्नाथ गाडे, हाजी 
महेमुद देशमुख, गोरक्षनाथ गाडे, विश्वास पवार, खतीबभाई देशमुख, ताराचंद तनपुरे, देवेंद्र लांबे उपस्थित होते.    

Web Title: The people took the election for development - Prajakat Tanpure; Meeting with Baragaon Nandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.