शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

महिला गटांच्या उत्पादनांचा अस्मिता ब्रॅण्ड करणार - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:44 AM

महिलांमध्ये उपजतच चवदार पदार्थ बनविण्याची कला आहे. पण, त्यांना आकर्षक पॅकेजिंग करता येत नाही़ सरकारतर्फे महिलांना उत्तम पॅकेजिंग व मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाईल, तसेच त्यांच्या उत्पादनांचा ‘अस्मिता’ ब्रॅण्ड करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केली.

अहमदनगर : महिलांमध्ये उपजतच चवदार पदार्थ बनविण्याची कला आहे. पण, त्यांना आकर्षक पॅकेजिंग करता येत नाही़ सरकारतर्फे महिलांना उत्तम पॅकेजिंग व मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाईल, तसेच त्यांच्या उत्पादनांचा ‘अस्मिता’ ब्रॅण्ड करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केली.साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रेतील बचत गटांतील महिलांना मार्गदर्शन करताना मुंडे बोलत होत्या. पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे, विभागीय आयुक्त महेश झगडे, उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने आदी यावेळी उपस्थित होते. बचत गटांच्या प्रदर्शनामध्ये तोच तोपणा आहे. तो बंद झाला पाहिजे़ केवळ सरकारचे पैसे खर्च करायचे म्हणून प्रदर्शने भरवू नका. प्रदर्शनातून महिला उद्योजक कशा बनतील, यावर भर द्यावा़ त्यासाठी लागणारी मदत सरकार करील, असे मुंडे यावेळी म्हणाल्या.बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. उद्योजकाच्या दृष्टीतून महिलांनी काम करण्याची गरज आहे. केवळ फळे आणून ते विकणे म्हणजे उद्योग नाही. त्यापासून काही नवीन पदार्थ तयार केले पाहिजेत. त्याचे आकर्षक पॅकिंग करून त्याला कुठे चांगला भाव मिळेल, याचाही अभ्यास केला पाहिजे़ बीड मतदारसंघात दरवर्षी प्रदर्शन भरते. तिथे अस्मिता हा नवीन ब्रॅण्ड तयार केला आहे. महिलांनी तयार केलेल्या मालाची विक्री करून त्यांना पैसे दिले जातात. त्यांना आता रिटेलर बनविण्याची भूमिका घेतली आहे, असे मुंडे म्हणाल्या.

बँका नाक मुरडतात

महिलांमध्ये जिद्द आहे. चिकाटी आहे, बचत गटांचा मालही चांगला आहे. प्रशिक्षण नाही़ वेळोवळी मागणी करूनही ते मिळत नाही़ त्याचबरोबर बँकांकडून अर्थसहाय्य केले जात नाही, अशी खंत विखे यांनी व्यक्त केली. बचत गटांच्या प्रदर्शनात गेल्या अनेक दिवसांपासून तोच तो पणा दिसतो. तो कमी करून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे सरकारने ब्रॅडिंग केले पाहिजे, असे मत झगडे यांनी यावेळी व्यक्त केले.

मुलींचे गुणोत्तर

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न होत असताना महिला संसाराला हात लावत नसल्याने स्त्री भ्रूण हत्या होते. मात्र त्यात आता सुधारणा झाली आहे. एक हजार पुरुषांमागे ९१४ मुली आहेत़ ही मोठी मिळकत आहे. मुलींना शिक्षण, रोजगार, सुरक्षितता मिळाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना सन्मान सुध्दा मिळाला पाहिजे, त्यासाठी घरातीलच महिलांनी पुढाकार घ्यावा, असे मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPankaja Mundeपंकजा मुंडे