शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

एका फोन कॉलनं ‘ती’ची झाली बंधनातून मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 7:05 PM

‘एका तरुण मुलीला तिचा नवरा आमच्या येथे सोडून गेलाय.

अहमदनगर : ‘एका तरुण मुलीला तिचा नवरा आमच्या येथे सोडून गेलाय. तिची नजर एकाच ठिकाणी खिळलेली आहे. आठ दिवसांपासून तिने अन्नाचा कण अन पाण्याचा थेंबही गिळलेला नाही. तब्येतही खालावली आहे. डॉ. तुम्हीच आधार देऊ शकता,’ असा आवाज मोबाईलवर पलीकडील व्यक्तीचा आला. डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे यांनी ताबडतोब धाव घेत तरुणीला देहरे येथील माऊली संस्थेत दाखल करत सर्व बंधनातून मुक्तता केली.चार-पाच दिवसांपुर्वी घडलेली ही घटना. दररोजच्या कामासाठी डॉ.राजेंद्र धामणे निघाले होते. इतक्यात त्यांचा मोबाईल नेहमीप्रमाणे खणाणला. पलीकडून कोणीतरी अनोळखी व्यक्ती बोलत होती. मोबाईलवर बोलणारी व्यक्ती अहमदनगर शहराजवळ राहणारी होती. ‘आमच्या येथे एका तरुण मुलीला आठ दिवसांपुर्वी सोडले आहे. तिने तेव्हापासून काहीच खाल्ले अन पिलेही नाही, त्यामुळे तुम्ही तिला घेऊन जा, अशी विनंती याने डॉ. धामणे यांना केली. नगरजवळच हे स्थळ आहे. अनेक ठिकाणांहून लोक येथे येतात. मानसिक आजार झालेला व्यक्ती येथे ठेवल्यानंतर बरे होतात, अशी लोकांची गैरसमजूत आहे. देवाची अवकृपा, भूत बाधा, करणी किंवा जादूटोणा केला असे अनेकजण समजतात. यातूनच मानसिक आजार झालेल्या व्यक्तींना आणून बांधतात.अशाच एका तीव्र मानसिक आजारी तरुणीला तिचा नवरा येथे घेवून आला. सोबत एक लहान बाळही होते. तिची अवस्था खूपच भयाण होती. तिला स्वत:चे भान नव्हते. नजर सरळ अन एकटक असायची. आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टीची जाणीव नाही. तिच्या नव-याने तिच्या पायात साखळदंड अडकवून कुलूप लावले. मुलाला औषध घेवून येतो म्हणून गायब झाला. आठ दिवस महिला आहे त्याच अवस्थेत होती. तब्बल आठ दिवस काहीच न खाल्ल्यानं अशक्त झाली होती. एका फोन कॉलमुळे डॉ. धामणे यांनी या महिलेला आधार देत सर्व बंधनातून तिची मुक्तता केली.माऊली कुटुंबात २०० सदस्यनगर तालुक्यात देहरे येथे डॉ.धामणे दाम्पत्यांनी मनोरुग्ण महिलांना आधार देण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठान सुुरु केले आहे. बेवारस असणा-या महिलांना येथे आधार दिला जातो. नगर-मनमाड हायवेलगत असणा-या या संस्थेत आतापर्यत तब्बल २०० महिला सदस्य आहेत.‘समाजात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रध्दा आहेत. एखाद्या ठिकाणी ठेवल्यानंतर मानसिक आजार बरा होतो, ही पण एक अंधश्रध्दा आहे. अशा परिस्थतीत घरच्यांनीच आधार देणे गरजेचे आहे. दवाखान्यात उपचार घ्यावेत. उपचार घेतल्यानंतर हा आजार बरा होतो.’ असे माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.राजेंद्र धामणे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय