शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

एकतर्फी प्रेम : तरुणीला छळणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:14 AM

एकतर्फी प्रेमातून तरुणीला रस्त्यात अडवून लग्नासाठी तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणा-या तरुणाला दिलासा सेलच्या पथकाने अटक केली़

अहमदनगर : एकतर्फी प्रेमातून तरुणीला रस्त्यात अडवून लग्नासाठी तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणा-या तरुणाला दिलासा सेलच्या पथकाने अटक केली़ मंगळवारी (दि़०२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली़संदेश मनोहर गायकवाड (रा़ राहुरी खुर्द ता़ राहुरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे़ नगर शहरात राहणाºया तरुणीची संदेश याच्यासोबत ओळख होती़ मागील दीड वर्षांपासून संदेश हा सदर तरुणीला लग्नाची मागणी घालून त्रास देत होता़ याबाबत पीडित तरुणीने काही दिवसांपूर्वी येथील स्नेहाधार संस्थेकडे तक्रार केली होती़ मंगळवारी सकाळी संदेश याने सदर तरुणीस फोन केला़ तिने मात्र त्याचा फोन घेतला नाही़ याबाबत तिने स्नेहाधार संस्थेला माहिती दिली़ संस्थेने या तरुणीस स्नेहालयाच्या कार्यालयात बोलाविले़ तरुणी रिक्षात बसून स्नेहालयाच्या कार्यालयाकडे जात होती़ याचवेळी संदेश गायकवाड याने रिक्षाचा पाठलाग सुरू केला़ ही बाब तरुणीच्या निदर्शनास आली तेव्हा तिने पुन्हा स्नेहाधार संस्थेला फोन करून माहिती दिली आणि सदर तरुणी प्रेमदान चौकात रिक्षातून खाली उतरली़ दरम्यान या घटनेबाबत स्नेहाधार संस्थेने दिलासा सेलला माहिती दिली होती़ पे्रमदान चौकात संदेश याने तरुणीचा रस्ता अडवून ‘तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही ते सांग नाहीतर मी तुझा जीव घेईल व मी पण मरण’ असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली़ याचवेळी घटनास्थळी दिलासा सेलचे पथक दाखल झाले़ पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, पोलीस नाईक अर्जुन आव्हाड, सुदाम लोढे, रोहिणी दरंदले व स्वाती गुंजाळ यांनी संदेश गायकवाड याला ताब्यात घेतले़ पोलिसांनी त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे एक चॉपर व लोखंडी फायटर आढळून आले़ या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस