One dies in firing at butter Financial Transaction Events | लोणी येथे गोळीबारात एकाचा मृत्यू; आर्थिक देवाणघेवाणीतून घडली घटना 
लोणी येथे गोळीबारात एकाचा मृत्यू; आर्थिक देवाणघेवाणीतून घडली घटना 

लोणी :  दोन गटात शाब्दिक चकमकीतून वादावादी झाली. यानंतर एकाने केलेल्या गोळीबारात एका जणाचा मृत्यू झाला. ही घटना लोणी (ता.राहाता) येथील हसनापूर रस्त्यावर साई छत्रपती या हॉटेलच्या आवारात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास  घडली.
फरदिन उर्फ भैय्या आबु कुरेशी (रा.श्रीरामपूर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, उमेश नागरे, अक्षय बनसोडे, सुभाष कदम, अरुण चौधरी (चौघे रा.लोणी) तर संतोष सुरेश कांबळे, सिराफ उर्फ आयुब शेख, शहारूख शहा पठाण, फरदिन उर्फ भैय्या आबू कुरेशी (तिघेही रा.श्रीरामपूर) हे सात जण दारू पिण्यासाठी व जेवणासाठी साई छत्रपती या हॉटेलमध्ये आले होते. यावेळी त्यांची हॉटेलच्या आवारातच आपसाआपसात शाब्दिक बाचाबाची झाली. या शाब्दिक बाचाबाचीतूनच या सात पैकी एकाने फरदिन उर्फ भैय्या आबू कुरेशी याच्यावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे कुरेशी हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर इतर सर्व जण फरार झाले होते. मात्र  सोमवारी सकाळपर्यंत सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आर्थिक देवाण घेवाणीतून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक एन. बी. सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: One dies in firing at butter Financial Transaction Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.