शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

प्रस्थापित पक्षांकडून ‘ओबीसीं’ना ‘किंचित’ स्थान

By सुधीर लंके | Published: April 19, 2019 7:19 PM

धनगर, वंजारी, माळी समाजाची उमेदवारीत उपेक्षा; मुस्लिम समाजालाही केवळ एक जागा

सुधीर लंके

अहमदनगर : निवडणुकीत राजकीय पक्षांना सर्वच जातींची मते हवी असतात. मात्र, उमेदवारी देताना हा समतोल टिकविला जात नाही असे दिसते. आरक्षणासाठी आग्रही असलेल्या धनगर समाजाला यावेळी एकाही प्रमुख पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. तीच अवस्था माळी व वंजारी समाजाची आहे. माळी समाजातून केवळ राष्ट्रवादीने दोन, तर वंजारी समाजातून भाजपने एक उमेदवार दिला. मुस्लिम समाजालाही केवळ एक प्रतिनिधीत्व आहे. मराठा व कुणबी समाजाचे प्रमाण गतवेळेएवढेच आहे. बौद्ध समाजाचा उमेदवारीचा टक्काही घटला आहे.राज्यातील ४८ मतदारासंघांपैकी अनुसूचित जातीसाठी पाच तर जमातींसाठी चार मतदारसंघ आरक्षित आहेत. उर्वरित ३९ मतदारसंघ खुले आहेत. या खुल्या मतदारसंघांत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी दिलेल्या उमेदवारांचा जातनिहाय आढावा घेतला असता अनेक समाज उमेदवारीपासून वंचित असलेले दिसतात. धनगर समाजाचा वरील चार प्रमुख पक्षांनी उमेदवारीसाठी विचार केलेला नाही. २०१४ मध्ये महादेव जानकर हे युतीकडून बारामतीतून लढले होते.वंजारी समाजाच्या मतांकडे सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असतो. गोपीनाथ मुंडे यांनी या समाजाला राजकीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. या समाजाला भाजपने प्रीतम मुंडे यांच्या रुपाने केवळ एक जागा दिली. २०१४ मध्येही हीच स्थिती होती. माळी समाजातून केवळ राष्ट्रवादीने समीर भुजबळ व डॉ. अमोल कोल्हे हे दोन उमेदवार दिले आहेत. २०१४ मध्ये या समाजातून राष्ट्रवादीने दोन तर कॉंग्रेसने एक उमेदवार दिला होता.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पाच मतदारसंघात बौद्ध समाजाला कॉंग्रेसने दोन तर भाजपने एका मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. दक्षिण मध्य मुंबई हा खुला मतदारसंघ आहे. या खुल्या जागेवर कॉंग्रेसने बौद्ध समाजाला संधी दिली आहे. २०१४ मध्येही बौद्ध समाजाचा केवळ या दोन पक्षांनीच विचार केला होता. बौद्धेतर समाजात कॉंग्रेसने तीन, सेनेने तीन तर भाजपने एक उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादीने अमरावतीत अपक्षाला पाठिंबा दिला आहे. मुुस्लिम समाजाला २०१४ च्या निवडणुकीत प्रमुख चार पक्षांपैकी केवळ कॉंग्रेसने एक जागा दिली होती. यावेळीही तीच स्थिती आहे. आग्री समाजाला प्रमुख पक्षांकडून चार जागांवर संधी मिळाली आहे.याशिवाय तेली, शेट्टी, कायस्थ, मारवाडी, गुजराथी, जैन, खाटिक, लिंगायत, भंडारी या समाजांना प्रत्येकी एका जागेवर संधी मिळाली आहे. गवळी व लेवापाटील समाजाला प्रमुख पक्षांनी प्रत्येकी दोन जागा दिल्या आहेत.लोकसभेला ‘इलेक्टिव्ह’ मेरिट पाहताना त्या मतदारसंघातील प्रभावशाली नेत्याला व समाजाला उमेदवारी देण्याचे धोरण दिसते. विधानसभेला यापैकी काही जातींना संधी दिली जाताना दिसते.

मराठा समाजाचे उमेदवार वाढले

या निवडणुकीत खुल्या ३९ मतदारसंघांपैकी दोन्ही कॉंग्रेसने १४ तर सेना-भाजप युतीने २२ मतदारसंघांत मराठा उमेदवार दिलेले दिसतात. याशिवाय कुणबी समाजाला कॉंग्रेस आघाडीने सहा तर युतीने चार जागांवर संधी दिली आहे. २०१४ च्या तुलनेत युतीने मराठा समाजाचे अधिक उमेदवार दिले आहेत. त्यावेळी आघाडीने मराठा समाजाचे १६ तर युतीने १८ उमेदवार दिले होते. यावेळी पंधरा मतदारसंघांत मराठा विरुद्ध मराठा तर तीन मतदारसंघांत कुणबी विरुद्ध कुणबी अशी लढत आहे.

ब्राम्हण समाजाचे सात उमेदवार

ब्राम्हण समाजाला प्रमुख सर्वच पक्षांनी संधी दिलेली आहे. एकूण सात ब्राम्हण उमेदवार यावेळी रिंगणात आहेत. गतवेळी ही संख्या सहा होती.

या निवडणुकीत माळी समाजाला राष्ट्रवादी व मित्र पक्षाने उमेदवारीची संधी दिली. इतर पक्षांनी संधी दिलेली नाही. अशी उपेक्षा नको.- बापूसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष समता परिषद.

प्रस्थापित पक्षांनी धनगर समाजाला उमेदवारी देताना डावलले. केवळ वंचित आघाडीने या समाजाला प्रतिनिधीत्व दिले.- डॉ. इंद्रकुमार भिसे

कुठलाच पक्ष वंजारी समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व देत नाही. या समाजाला एखादी जागा दिली म्हणजे पुरे झाले असा विचार पक्षांनी करायला नको.- अ‍ॅड. भास्करराव आव्हाड, अभ्यासक.

मराठा समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधीत्व आहे. पण, यामुळे मराठा समाजाने हुरळून जाता कामा नये. मराठा उमेदवार बघितले तर तेच ते प्रस्थापित चेहरे समोर आले आहेत. यात सामान्य मराठा समाजाला संधी मिळालेली नाही.- शिवानंद भानुसे, प्रवक्ता संभाजी ब्रिगेड

लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व देणे अपेक्षित होते. मात्र केवळ एक उमेदवारी मिळाली. जोवर प्रतिनिधीत्व मिळणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास कसा होणार?- अर्शद शेख, सामाजिक अभ्यासक

ब्राम्हण समाजाचे मूळ महाराष्ट्रतील खरे पाचच उमेदवार आहेत. त्यातही पुण्यात आपसात लढत आहे. समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व मिळालेले नाही.- गोविंद कुलकर्णी, राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा. ब्राम्हण महासंघ.

वंचित आघाडीचे सोशल इंजिनिअरिंग

वंचित आघाडीने उमेदवारी देताना धनगर समाजाला सात , माळी समाजाला दोन तर, वंजारी समाजाला एका जागेवर संधी दिली. मुस्लिम पाच व बौद्ध समाजाला नऊ जागांवर संधी देण्यात आली. मराठा, कुणबी, भूमिहार ब्राम्हण या समाजांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली. वडार, कैकाडी, तेली, विश्वकर्मा, धीवर आदी छोट्या जातींनाही उमेदवारी देण्याचे धोरण घेण्यात आले. सत्तर वर्षानंतर पहिल्यांदा बहुतेक सर्व जातींना प्रतिनिधीत्व देण्याचे काम वंचित आघाडीने केले आहे. जेथे ग्रामपंचायतीच्या उमेदवाऱ्या मिळत नव्हत्या तेथे छोट्या जातींना लोकसभेची उमेदवारी देण्याचे धोरण प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेले आहे, अशी प्रतिक्रिया आघाडीचे राज्य निमंत्रक किसन चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रस्थापित पक्ष वंचित घटकांना उमेदवारी देत नाहीत. बसपाने मात्र सर्वच जातीधर्मातून उमेदवार देत राजकीय प्रक्रियेत सामाजिक समतोल राखला आहे.- सुरेश साखरे, प्रदेशाध्यक्ष बसपा.

बौद्ध समाजाची लोकसंख्या मोठी असताना या समाजाचे अस्तित्वच आजकाल राजकारणात नाकारले जात आहे. रामदास आठवले, कवाडे यांच्या पक्षांना एकही जागा दिलेली नाही. बौद्ध समाजाला गृहित धरले जाते. आंबेडकरी चळवळीची फाटाफूट व बौद्ध-बौद्धेतर दुही याला कारणीभूत आहे.- अशोक गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, युनायटेड रिपब्लिकन पक्ष.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना