नाटेगावकरांनी संकल्प रथ माघारी पाठवला; रथासमोर कांदे फेकून निर्यात बंदीचा निषेध केला

By सचिन धर्मापुरीकर | Published: December 23, 2023 10:46 PM2023-12-23T22:46:14+5:302023-12-23T22:47:01+5:30

कांदे फेकून रथाला माघारी पाठविण्यात आहे.

Nategaonkar sent Sankalp Rath back; Protested the export ban by throwing onions in front of the chariot | नाटेगावकरांनी संकल्प रथ माघारी पाठवला; रथासमोर कांदे फेकून निर्यात बंदीचा निषेध केला

नाटेगावकरांनी संकल्प रथ माघारी पाठवला; रथासमोर कांदे फेकून निर्यात बंदीचा निषेध केला

कोपरगाव (जि. अहमदनगर) :  तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने विविध योजणांची माहिती असलेला संकल्प रथ पिटाळून लावला आहे. ही घटना शनिवारी ( दि. २३) घडली. कांदे फेकून रथाला माघारी पाठविण्यात आहे.

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लादले. केंद्राचे हे धोरण शेतकरी विरोधात असल्याचा आरोप शेतकर्यानी केला.  शासकीय कर्मचाऱ्यांना तुमच्या प्रचारासाठी कशाला वापरता, त्यासाठी खाजगी माणसे नेमा, शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांची कामे करू द्या, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

यावेळी खंडू मोरे, भरत मोरे, डॉ. गोरक्षनाथ मोरे, एकनाथ मोरे, प्रभाकर मोरे यांनी या रथाला तीव्र शब्दात विरोध केला आहे. मोदी सरकार येवून दहा वर्ष होत आली, या काळात शेतकऱ्यांना मारणी घालण्याचे काम या सरकारने केले. कांद्याच्या भावाला मोदी सरकार आडवे झाले आहे.  निर्यात बंदी केली, भाव वाढ झाली की, हे सरकार काही ना काही निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे.

शेतकऱ्यांच्या कांद्याला साडेचार हजार रुपये भाव मिळत होता. तेव्हा सरकारच्या पोटात दुखले. त्यांनी कांदा निर्यात बंदी केली त्यामुळे आता बाराशे रुपये भाव मिळत आहे. मोदीसरकारची धोरणे शेतकरी विरोधी व ग्राहक धार्जीने धोरणे आहेत, असे शेतकरी म्हणाले. 
 

Web Title: Nategaonkar sent Sankalp Rath back; Protested the export ban by throwing onions in front of the chariot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.