शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने झाली दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 7:31 PM

जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने ही दगडफेक झाली. यात सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह एक शिवसैनिक जखमी झाला आहे.

ठळक मुद्देआमदार विजय औटी यांच्या गाडीचे चाक जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या पायावरुन गेले. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक केली.शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या गटाने ही दगडफेक केल्याचे औटी यांचा गट सांगत आहे तर लंके यांचा गटाकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे.लंके व त्यांचे समर्थक उभे होते, त्याच्याविरुद्ध बाजुने ही दगडफेक करण्यात आली. त्यात लंके यांचा समर्थक असलेल्या प्रितेश पानमंद या तरुणाचे डोके फुटले आहे.

पारनेर (अहमदनगर) : शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये असणा-या आमदार विजय औटी यांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा प्रकार मंगळवारी पारनेर येथे घडला. जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने ही दगडफेक झाली. यात सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह एक शिवसैनिक जखमी झाला आहे.पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार विजय औटी यांचा अभीष्टचिंतन सोहळा मंगळवारी सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पारनेर येथे आयोजित केला होता. 

आपले भाषण संपवून ठाकरे सभास्थानाहून आपल्या वाहनात बसले. त्याचवेळी सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या समर्थकांनी घोषणबाजी करून उध्दव ठाकरे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वाहनाला गराडा घातला जात असतानाच त्याच ताफ्यात असणारी आमदार औटी यांची गाडी गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न वाहनाचा चालक करीत होता. त्या वाहनाचे चाक सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या पायावर गेले तर सेनेचे उपनेते अनिल राठोड थोडक्यात बचावले.

 याच गोंधळात लंके समर्थकांनी आमदार औटी यांच्या वाहनाला लक्ष्य करून गाडीवर दगडफेक केली. आमदार विजय औटी यावेळी वाहनात नव्हते तर ते व्यासपीठावर होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून लंके समर्थकांना दूर लोटले तर सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके हे तेथून निघून गेले. दरम्यान लंके समर्थकांनी तेथे उपस्थित राहून घोषणाबाजी सुरूच ठेवली होती. या प्रकाराची सेनेकडून गंभीर दखल घेण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

संदेश कार्ले जखमी

सेनेचे नगरचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते जखमी झाले आहेत. तर प्रितेश पानमंद या शिवसैनिकाच्या डोक्याला दगड लागल्यामुळे तो जखमी झाला आहे. या प्रकारानंतर सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक झाली नसल्याचे म्हटले असून दुसरे वाहन अंगावर आल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

दगडफेक नेमकी कोणत्या गटाने केली?

आमदार विजय औटी यांच्या गाडीचे चाक जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या पायावरुन गेले. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक केली. ही दगडफेक नेमकी कोणत्या गटाने केली, हे अद्याप उघड झालेले नाही. शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या गटाने ही दगडफेक केल्याचे औटी यांचा गट सांगत आहे तर लंके यांचा गटाकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. ज्या बाजून लंके व त्यांचे समर्थक उभे होते, त्याच्याविरुद्ध बाजुने ही दगडफेक करण्यात आली. त्यात लंके यांचा समर्थक असलेल्या प्रितेश पानमंद या तरुणाचे डोके फुटले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाVijay Autiआ. विजय औटी