शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

आमदार निलेश लंके यांचा ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न : मोबाईल अ‍ॅप सांगणार विद्यार्थ्यांनी अभ्यास केला की नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 2:34 PM

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच भावला.

पारनेर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच भावला. पवार यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क करुन याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली. ऑनलाइन शाळा या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला किंवा नाही, हेही शिक्षकांना तपासता येणार आहे.तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या सहकार्यातून ऑनलाइन शिक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. याची माहिती आमदार लंके यांनी गुरूवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पवार यांची भेट घेऊन दिली. तब्बल अर्धा तास विविध बाबींची माहिती घेतल्यानंतर पवार यांनी यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क करून विषय समजावून घेण्याच्या सूचना दिल्या. या सॉफ्टवेअरचा फायदा राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्याकडून तांत्रिक माहिती घेतल्यानंतर पवार यांनी शिक्षण क्षेत्रातील जाणकारांशीही चर्चा केली. प्रत्यक्ष शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण देताना काय अडचणी येतात, त्या कशा सोडविल्या, याची विचारणाही पवारांनी केली. यापूर्वी विविध शिक्षक व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत होते. परंंतू दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांनी केला किंवा नाही, हे समजत नव्हते. नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्यांने किती प्रश्नांचा अभ्यास केला, किती विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आॅनलाईन हजेरी लावली, विद्यार्थ्यास एखाद्या विषयाचे किती आकलन झाले याची संपूर्ण माहिती या सॉफ्टवेअरमध्ये असल्याचे लंके यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही तात्काळ वेळ देत विषय समजावून घेतला. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना या उपक्रमाची माहिती देण्याच्या सूचना करतानाच या उपक्रमासंदर्भात पुणे येथे शिक्षण संचालक तसेच शिक्षण आयुक्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भातही मंत्री गायकवाड यांनी सूचना दिल्या. बैठकीचा दिवस निश्चित झाल्यानंतर आ. लंके व शिक्षक गुंड हे या बैठकीस उपस्थित राहून या सॉफ्टवेअरसंदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत.

पारनेर पॅटर्नकडे राज्याचे लक्ष!

डिजिटल स्कूल क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संदीप गुंड यांनी आमदार निलेश लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमात सहभाग नोंदविल्याने ऑनलाइन शाळेच्या पारनेर पॅटर्नकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. डिजिटल शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुंड यांना तिन वेळा राष्ट्रपतींकडून गौरविण्यात आले असून असा गौरव होणारे गुंड हे देशातील एकमेव प्राथमिक शिक्षक आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरVarsha Gaikwadवर्षा गायकवाडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस