शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Maharashtra Election 2019: गेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:57 PM

कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक २०१९ - शिक्षण संस्थांचं जाळं उभारल्यानं बारामती विकासात्मक दृष्टिकोनातून आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगती पथावर आली

अहमदनगर - विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो असं म्हणायची वेळ आलीय. तरी 'मी पुन्हा येणार' असं CM सांगतात. कशासाठी? असा सवाल राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी विचारला आहे. 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'मी पुन्हा येणार' असं मुख्यमंत्री सांगतात. कशासाठी? राज्याला कर्जबाजारी करण्यासाठी, बेरोजगारी वाढवण्यासाठी, संसार रस्त्यावर आणण्यासाठी, शेतकरी आत्महत्या वाढवण्यासाठी,साखर-कांदा आयात करण्यासाठी पुन्हा यायचंय? असा टोला अजित पवारांनी लगावला 

तसेच शिक्षण संस्थांचं जाळं उभारल्यानं बारामती विकासात्मक दृष्टिकोनातून आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगती पथावर आली. कर्जत-जामखेड मतदारसंघातही चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. महिला बचत गटाच्या वस्तू देखील बाजारात विकल्या जातील, अशी तरतूद करू असं आश्वासन अजित पवारांनी लोकांना दिलं. 

दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघाचा रोहित पवार चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व करतील,असा मला विश्वास आहे. कुणाला कमीपणा वाटेल,असं काही घडणार नाही. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी करायचा असतो, असं शरद पवार नेहमी सांगत आले आहेत. त्यामुळे रोहितला निवडून द्यावं असं आवाहन अजित पवारांनी लोकांना केले.  त्यापूर्वी बीडमध्ये झालेल्या सभेतही अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. भाषण करताना बोलले ते तोलले पाहिजे. खोटे भाषण करणे आणि फसवणूक करणे याचा धंदा झाला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, वाढत जातीयवाद या प्रमुख समस्या असताना भाजपचे सरकार मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया यामध्ये व्यस्त आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरु केलेली शेतकरी कर्ज माफी योजना सपशेल फसवी असून हे भर सभेत पुराव्यानिशी अजित पवारांनी उपस्थितांना दाखवले. ज्याचं जळत त्यालाच कळत यामुळेच इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेले. महाराष्ट्राची सत्ता आमच्या हातात द्या तीन महिन्यात ७/१२ कोरा करू असा दावा अजित पवारांनी शेतकऱ्यांना केला.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019