भाजपात बंडखोरी : शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष लढणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 01:32 PM2019-03-23T13:32:31+5:302019-03-23T13:50:40+5:30

शिर्डी मतदारसंघातून सेनेकडून उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याची भुमिका माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जाहीर केली.

Lok Sabha Election 2019 : Bhausaheb Wakchaure from Shirdi will fight independently | भाजपात बंडखोरी : शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष लढणार 

भाजपात बंडखोरी : शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष लढणार 

googlenewsNext
ठळक मुद्देशिर्डी मतदारसंघातून सेनेकडून उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याची भुमिका माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जाहीर केली. शिर्डी येथील निवासस्थानी बैठकीत त्यांनी भुमिका जाहीर केली आहे. निवडून आलो तर पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरच व नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. 

शिर्डीशिर्डी मतदारसंघातून सेनेकडून उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याची भुमिका माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जाहीर केली. शिर्डी येथील निवासस्थानी बैठकीत त्यांनी भुमिका जाहीर केली आहे. 

वाकचौरे म्हणाले, जनतेच्या प्रेमापोटी आणि आग्रहाने निवडणूक लढवतोय. निवडून आलो तर पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरच व नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत वाकचौरे यांनी काँग्रेसकडून निवडणुक लढविली होती. यामध्ये सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी वाकचौरे यांचा पराभव केला. मध्यंतरी वाकचौरे यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला होता. आणि आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वाकचौरे यांनी पुन्हा बंडखोरी केली आहे. शिवसेना, काँग्रेस,भाजपा आणि आता अपक्ष असा वाकचौरे यांचा प्रवास राहिला आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 : Bhausaheb Wakchaure from Shirdi will fight independently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.