शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पत्रकार मारहाण प्रकरण : हल्लेखोरांवर मोक्काअंतर्गत कारवाई करा, नेवासेतील पत्रकारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 1:03 PM

राहुरी येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतीनिधी जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करून तसेच हल्लेखोरांवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी,

नेवासा : राहुरी येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतीनिधी जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करून तसेच हल्लेखोरांवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, यामागणीसाठी नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने नायब तहसिलदार ज्योतिप्रकाश जायकर व पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी निषेध सभा घेण्यात आली.राहुरी शहरात मोटार सायकल चोरतांना एका गुंडाला रंगेहाथ पकडल्या नंतर त्याला सोडून देण्यासाठी गावगुंडांनी एक तास शहरामध्ये धुमाकुळ घालुन दंगल केली.त्यावेळी दैनिक लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले हे वृत्तसंकलनासाठी घटनास्थळी गेले असता त्यांचा मोबाईल हिसकावुन घेवून जबर मारहाण करण्यात आली. त्यावेळी व्यापा-यांना ही जबर मारहाण करण्यात आली.या घटनेचा नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. तसेच या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत तसेच पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंतर्गत कारवाई करावी.तसेच पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचे नोंदणीकृत वृत्तपत्राच्या सर्व प्रतिनिधींना सरंक्षण मिळावे.अशी मागणी करण्यात आली.निषेध सभेप्रसंगी अध्यक्ष विनायक दरंदले, सचिव सुखदेव फुलारी, सुनील गर्जे, कारभारी गरड, उमाकांत भोगे, बाळासाहेब नवगिरे, दिलीप शिंद यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सुहास पठाडे, गुरुप्रसाद देशपांडे, अनिल गर्जे, कैलास शिंदे, मकरंद देशपांडे, संतोष टेमक, शंकर नाबदे, पवन गरुड, सचिन दसपुते, उमाकांत भोगे, गणेश बेल्हेकर, रमेश पाडळे, मंगेश निकम, अभिषेक गाडेकर, विठ्ठल उदावंत, श्रीनिवास रक्ताटे, रमेश शिंदे, देविदास चौरे, इकबाल शेख, मोहन गायकवाड, सतीश उदावंत, राजेंद्र वाघमारे, सुनील पंडित, इस्माईल शेख, चंद्रकांत दरंदले, संदीप गाडेकर उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा