In the Jatgaon, thieves robbed four donut boxes of Bhairavanath Temple | जातेगावात भैरवनाथ देवस्थानच्या चार दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या
जातेगावात भैरवनाथ देवस्थानच्या चार दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या

पळवे : पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जातेगाव येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या चार दानपेट्या मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडल्या. दानपेट्यातील सुमारे १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली आहे.
भैरवनाथ मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून तेथील दानपेटी चोरट्यांनी फोडली. शिवाय देवाची तलवारही चोरली. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-याची चोरट्यांनी तोडफोड केली. यानंतर ही चोरी केली,  अशी फिर्याद देवस्थानचे अध्यक्ष अर्जुन बढे यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिली. 
 मागील सहा महिन्यापूर्वी अशीच या ठिकाणी चोरी झाली होती. याचा तपास सुरू असतानाच दुसरी चोरी झाल्याने जातेगांव ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 


Web Title: In the Jatgaon, thieves robbed four donut boxes of Bhairavanath Temple
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.