अखेर उलगडा झाला... प्रेयसीनेच मारले प्रियकराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:20 AM2021-02-14T04:20:46+5:302021-02-14T04:20:46+5:30

सुषमा रवींद्र गवाले, तेजस भोसले, अमोल कांबळे, प्रशांत बजरंग साबळे, राजेश विठ्ठल गायकवाड (सर्व रा. बारामती) असे अटक केलेल्या ...

It was finally revealed ... the lover killed the lover | अखेर उलगडा झाला... प्रेयसीनेच मारले प्रियकराला

अखेर उलगडा झाला... प्रेयसीनेच मारले प्रियकराला

Next

सुषमा रवींद्र गवाले, तेजस भोसले, अमोल कांबळे, प्रशांत बजरंग साबळे, राजेश विठ्ठल गायकवाड (सर्व रा. बारामती) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या खुनाची मुख्य सूत्रधार सुषमा गवाले ही आंबेगाव परिसरात भंगारचा व्यवसाय करीत होती. मयत रमेश जाधव आणि तिचे संबंध होते. लाॅकडाऊन काळात सुषमा बारामतीला तिच्या भावाकडे राहण्यासाठी गेली होती. यादरम्यान सुषमा हिची राजेश गायकवाड (रा. माझगाव, जि. सातारा) याच्याशी मैत्री झाली. दरम्यान रमेश जाधव हाही सुषमा हिला भेटण्यासाठी नेहमी बारामतीला जात होता. तो सुषमाकडे नेहमी शरीर सुखाची मागणी करीत होता. रमेश याच्या या त्रासाला कंटाळून अखेर सुषमा हिने तेजस भोसले, अमोल कांबळे, प्रशांत, साबळे व राजेश गायकवाड यांच्या मदतीने रमेश याचा खून करण्याचा कट रचला. यासाठी रमेश याला जमीन दाखविण्याच्या बहाण्याने ३१ जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील निर्जनस्थळी आणले. यावेळी रात्र झाली होती. घटनास्थळी आरोपींनी रमेश याची सत्तुरने हत्या केली. त्यानंतर त्याचा गळा कापून शरीर एकीकडे तर शिर दुसरीकडे पुरले. हे प्रेत कुत्र्यांनी उकरल्याने या खुनाचा उलगडा झाला. दरम्यान आरोपींनी दोन दिवसांनंतर शिर खड्ड्यातून काढले आणि सिद्धिटेक शिवारात नेऊन जाळून टाकले. अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप तेजनकर, विठ्ठल पाटील, पोलीस हेड काॅन्स्टेबल अकुंश ढवळे, प्रकाश मांडगे दादा टाके, किरण बोराडे, अमोल कोतकर, विनायक जाधव, संजय काळे, गोकुळ इंगवले, राजू भरू, किरण जाधव, प्रशांत राठोड यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले.

असा झाला उलगडा

मयत रमेश जाधव यांच्या शर्टवर शुभम टेलर्स पुणे ४६ असा लोगो होता. या लोगोवरून पोलिसांनी पुणे शहरातील पोलीस स्टेशनला माहिती दिली. नातेवाइकांनी शर्टवरून प्रेत ओळखले. जाधव यांच्या मिसिंगबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होती. मृतदेह जाधव यांचा असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक ढिकले यांच्या पथकाने तपास केला तेव्हा या घटनेचा उलगडा झाला.

फोटो १३ श्रीगोंदा क्राइम

श्रीगोंदा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.

Web Title: It was finally revealed ... the lover killed the lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.