शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

हित पाहणारा 'रोहित', दहावीत 90 टक्के मिळवणाऱ्या अनुजाच्या शिक्षणाचा खर्च उचलला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 8:40 PM

अनुजा रोडे लहान असताना तिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या दुख:द घटनेला 7 वर्षे झाली.

मुंबई - शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार हे राजकारणात चांगलेच सक्रीय झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यासाठी, त्यांनी स्वत:ही कबुली दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित यांचे दौरे वाढले आहेत. रोहित यांनी नुकतेच एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. शेतकरीकन्या अनुजाचे हित पाहत रोहित यांनी दहावीनंतरचा तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे.   

अनुजा रोडे लहान असताना तिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या दुख:द घटनेला 7 वर्षे झाली. स्वतःच्या शेतात राबून आणि शिक्षणाला हातभार लागावा म्हणून लोकांच्या शेतात मोलमजुरी करून मुलांच्या शिक्षणासाठी अनुजाच्या आई किसनाबाईंनी खुप परिश्रम केले.दहावीमध्ये ९०.८०% गुण मिळवून अनुजा उत्तीर्ण झाली आणि वर्गात दुसरा क्रमांक पटकावला. अनुजाने कुठल्याही सुविधा नसताना इतकं मोठं यश मिळवलं आहे. अनुजाच्या या यशस्वी भरारीबद्दल रोहित पवार यांनी तिचं अभिनंदन केलं. अनुजाला पुढचे शिक्षण पूर्ण करायची इच्छा होती पण आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे, जेव्हा रोहित यांना कार्यकर्त्यांकडून याबाबत माहिती मिळाली की, अनुजाला तिचे स्वप्न पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत. तेव्हा रोहितने अनुजाला मदत करायचा निर्णय घेतला. रोहित यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत अनुजाच्या घरी जाऊन कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर अनुजाच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच, अनुजाला यापुढे निर्धास्तपणे पुढील शिक्षण घेण्यास सांगितले. रोहित यांच्या या पुढाकाराने अनुजाच्या आईला अत्यानंद झाला आहे. तर अनुजाचे कुटुंब गहिवरुन आले.  

टॅग्स :karjat-jamkhed-acकर्जत जमखेदEducationशिक्षणSSC Resultदहावीचा निकालPoliticsराजकारण