शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

कौशल्य विकासच्या आॅनलाईन प्रशिक्षणास संस्थांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 3:40 PM

लॉकडाऊनमुळे परराज्यातील कुशल कामगार गावी निघून गेले आहेत. उद्योजकांकडून कुशल कामगारांची मागणी होत आहे़. मात्र शहरी व ग्रामीण तरुण-तरुणींना रोजगाराची संधी निर्माण करून देणा-या कौशल्य विकास प्रशिक्षण व्यवसाय प्रशिक्षणाला कोरोनाचा फटका बसला आहे़.

अहमदनगर : लॉकडाऊनमुळे परराज्यातील कुशल कामगार गावी निघून गेले आहेत. उद्योजकांकडून कुशल कामगारांची मागणी होत आहे़. मात्र शहरी व ग्रामीण तरुण-तरुणींना रोजगाराची संधी निर्माण करून देणा-या कौशल्य विकास प्रशिक्षण व्यवसाय प्रशिक्षणाला कोरोनाचा फटका बसला आहे़.

कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण आयटी,संगणक टाईपराईटर, अशा विविध संस्थांच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे़. या संस्थांच्या माध्यमातून प्लंबर, फिटर, मेकॅनिक ते अगदी आरोग्य, बांधकाम, वस्त्रोउद्योग, कृषी, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. 

नगर जिल्ह्यात प्रशिक्षण देणा-या २१३ नोंदणीकृत संस्था आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यात जास्तीत जास्त तरूण प्रशिक्षणाचा लाभ घेत असतात. गेल्या मार्च महिन्यांत १७७ बॅचेस नगर जिल्ह्यातील विविध संस्थांमार्फत सुरू होत्या. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला़ त्यामुळे हे प्रशिक्षण ठप्प झाले आहे.

 सरकारने आॅनलाईन प्रशिक्षण देण्याबाबत कळविले आहे़. परंतु, आॅनलाईन प्रशिक्षण देणे शक्य नाही, असे संस्थांकडून कळविण्यात आले आहे. त्यात प्रशिक्षणार्थींची बायोमेट्रिक हजेरी घेणे संस्थांना बंधनकारक आहे. त्यानुसारच त्यांना सरकारकडून अनुदान देण्यात येते़ पण, सध्या कोरोनामुळे बायोमेट्रिक हजेरी बंद असल्याने प्रशिक्षण देण्यास अडथळा येत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़.जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. एप्रिलअखेर १ लाख ५५ हजार ७७१ नोेंदणीकृत बेरोजगार आहेत. लॉकडाऊनमुळे परराज्यातील कामगार निघून गेले आहेत. त्यांच्या जागी स्थानिकांना संधी देण्याचा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना संधी मिळणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरonlineऑनलाइनStudentविद्यार्थी