Video : 'पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 03:23 PM2021-11-13T15:23:42+5:302021-11-13T15:32:45+5:30

पाटणी येथील एका कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी पंकजा मुंडेंवर स्तुतीसुमने उधळली. तसेच, मोनिकाताई म्हणाल्या तुम्ही आमच्या मनातल्या, मी म्हटलं मुख्य लावू नका पुन्हा त्यांची अडचण.

'I am an MP because of Pankaja Munde, Sujay vikhe patil on pathardi programe | Video : 'पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको'

Video : 'पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको'

googlenewsNext

अहमदनगर - भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या नेहमीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून संबोधल्या जातात. मुंडे समर्थकांकडून त्यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हटलं जातं. आता, त्याच विधानावरुन भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना, मी मंत्री शब्दाच्या अगोदर मुख्य लावत नाही. कारण, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको, असे म्हटले. सुजय विखे यांच्या या भाषणाची सोशल मीडिया आणि भाजपच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

पाथर्डी येथील एका कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी पंकजा मुंडेंवर स्तुतीसुमने उधळली. तसेच, मोनिकाताई म्हणाल्या तुम्ही आमच्या मनातल्या, मी म्हटलं मुख्य लावू नका पुन्हा त्यांची अडचण. मला काही फरक पडत नाही, कारण मी कुणाला खातच नाही अन् कुणाला मोजतही नाही, असे सुजय विखे यांनी म्हटले. विखेंच्या बोलण्याचा रोक नेमका कोणाकडे होता, अशी चर्चा आता रंगली आहे.

पंकजा मुंडे या आमच्या मनातल्या मुख्यमंत्री आहेत, असं आमदार मोनिका राधळे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, भाषणा करताना खासदार सुजय विखे यांनी पंकजा मुडेंमुळेच आपण खासदार असल्याचं म्हटलं. तुम्ही माझ्या प्रचाराला आलात आणि तुमच्या आशीर्वादामुळेच मी खासदार झालो. मी जेव्हा ताईंकडे गेलो होतो, तेव्हा मला एबी फॉर्मही मिळाला नव्हता. फक्त माझा भाजपात प्रवेश झाला होता. त्यावेळी, ताईंनी मला विश्वास दिला, तू माझ्या भावासारखा आहे, असं त्या म्हणाल्या. आता, तुमच्या भावाने कॅम्प राबवून 38 हजार लाभार्थी या जिल्ह्यात तयार केले आहेत.  

पंकजा मुंडेंची महाविकास आघाडीवर टीका

आताच्या घडीला राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपांमध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका करत हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Web Title: 'I am an MP because of Pankaja Munde, Sujay vikhe patil on pathardi programe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.