शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

जिल्ह्यातील ४१ ग्रामपंचायतींत तपासणीची धामधूम : हागणदारीमुक्त अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:44 AM

अहमदनगर : जिल्ह्यातील नऊशेहून अधिक ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायती चालू वर्षात हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात येणार असून, जिल्ह्यातील ४१ ग्रामपंचायतींची तपासणी गटविकास अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे पथकाला दाखविण्यासाठी गावातील स्वच्छता शौचालयांचे नीटनेटके ठेवण्याची धावपळ सुरू आहे.सन २०१४ मध्ये शासनाने स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे. नगर जिल्हा हागणदारीमुक्त ...

अहमदनगर : जिल्ह्यातील नऊशेहून अधिक ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायती चालू वर्षात हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात येणार असून, जिल्ह्यातील ४१ ग्रामपंचायतींची तपासणी गटविकास अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे पथकाला दाखविण्यासाठी गावातील स्वच्छता शौचालयांचे नीटनेटके ठेवण्याची धावपळ सुरू आहे.सन २०१४ मध्ये शासनाने स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे. नगर जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात १ हजार ३११ ग्रामपंचायती आहेत.  त्यापैकी ९२३ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित झाल्या आहेत. चालू वर्षात उर्वरित ३८८ ग्रामपंचायतींची तपासणी मध्यंतरी राज्यस्तरीय समितीकडून करण्यात आली आहे. गावातील वैयक्तिक, सार्वजनिक शौचालये आणि स्वच्छता आदींची पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय पथकाने सदर ग्रामपंचायती हागणदारी मुक्तीसाठी पात्र ठरविल्या आहेत. त्यापैकी १० टक्के ग्रामपंचायतींची गटविकास अधिका-यांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी करण्यासाठी अन्य तालुक्यातील पथकाची नेमणूक जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे़ गटविकास अधिकाºयांच्या तपासणीनंतर जिल्हा परिषदेकडून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे गटविकास अधिकाºयांची तपासणी महत्वाची आहे. तपासणीबाबतची माहिती ग्रामसेवकांना कळविण्यात आली आहे. त्यामुळे गावोगावी वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, परिसर स्वच्छतेची तयारी गावक-यांकडून सुरू आहे. सदर गावांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत असून, तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात येणार आहे.या ग्रामपंचायती तपासणी सुरूअकोले- गर्दनी, मन्याळे, शिरपंजे बु, देवठाण, समशेरपूरजामखेड-चौंडी, वाकी, सावरगाव, गुरेवाडीकर्जत-जळगाव बजरंगवाडी, वडगाव तनपुर, बारडगाव सुद्रीकसंगमनेर-खरे, तिगाव, झोळे,कोपरगाव-कन्हेगाव,वेस, वारीश्रीरामपूर-हरेगावनेवासा-माका, माळीचिंचोरा, खरवडी, पाचेगाव,शेवगाव-कुरूडगाव, आंतरवाली, घोटणपाथर्डी-कोरडगाव, डोंगरवाडी, पिरेवाडी, जोगेवाडी, चिंचपूर इजदे, मुंगसेवेढे, मिडसांगवी,श्रीगोंदा- आनंदवाडी, शेडगाव, वांगदरीनगर-रांजणी, बहिरवाडी, माथनी, इमामपूर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद